Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:57 AM2020-03-16T04:57:03+5:302020-03-16T04:57:29+5:30

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.

Coronavirus: 234 Indian from Iran, 218 from Italy returned | Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

googlenewsNext

जैसलमेर : कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्यकेंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे.
संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.
इटलीतून २१८ भारतीयांना रविवारी भारतात आणण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी ९.४५ वाजता हे विमान दाखल झाले. या प्रवाशांना नंतर आयटीबीपी केंद्रात नेण्यात आले. इराणमधून ५८ नागरिकांना मंगळवारी भारतात आणण्यात आले होते, तर ४४ लोकांना इराणमधून शुक्रवारी देशात आणण्यात आले होते.

आगामी दोन आठवडे भारतासाठी महत्वाचे
नवी दिल्ली : आगामी दोन आठवडे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात जास्त झालेला
आहे.
इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात ३ रुग्ण होते. दुसºया आठवड्यात १५२ झाले तर, तिसºया आठवड्यात ही संख्या १०३६ व चौथ्या आठवड्यात ६३६२ झाली. इराण, फ्रान्स, न्यूयॉर्कमध्येही दुसºया आठवड्यानंतरच रुग्णांची संख्या वाढली आहे. आगामी तीन ते चार आठवडे योग्य व्यवस्थापन न केल्यास देशापुढे मोठे संकट उभा राहू शकते. त्यामुळे आगामी ३० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

Web Title: Coronavirus: 234 Indian from Iran, 218 from Italy returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.