Coronavirus: ३ महिने फक्त कोरोनाशी लढाई -एम.के. स्टॅलिन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:14 AM2021-05-24T06:14:24+5:302021-05-24T06:15:05+5:30
Coronavirus in Tamilnadu: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी येते तीन महिने फक्त कोरोना महामारीशी लढायचे आणि तेही सगळ्या पक्षांना सोबत घेऊन, अशी घोषणा केली आहे.
चेन्नई - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी येते तीन महिने फक्त कोरोना महामारीशी लढायचे आणि तेही सगळ्या पक्षांना सोबत घेऊन, अशी घोषणा केली आहे. राज्याच्या ३२ जिल्ह्यात यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली असून सगळ्या पक्षांचा समावेश असलेल्या समितीत त्या त्या जिल्ह्याचा प्रमुखाचा समावेश असेल.एम. के.स्टॅलिन यांनी हे असे उदाहरण घालून दिले आहे की, सगळ्या राजकीय नेत्यांनी विशेषत: उत्तरेतील नेत्यांनी अनुकरण केले पाहिजे. उत्तर भारतात कोरोना महामारीची तीव्रता जास्त आहे. स्टॅलिन म्हणाले की. येते तीन महिने द्रमुकमध्ये कोणतेही राजकारण असणार नाही. असेल फक्त कोरोनाशी लढणे.
मी मुख्यमंत्री बोलताेय
तामिळनाडूच्या कोविड-१९ हेल्पलाईनला अर्चना पद्माकर यांनी फोन केला. फोनवर स्टालिन म्हणाले, “मी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन बोलतोय.” पद्माकर या गोंधळल्या. त्यांना वाटले हा खोडसाळ प्रकार असावा. त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर फोन केला. उत्तर आले, “मी प्रत्यक्ष मुख्यमंत्री बोलतोय. सरकारच्या कोविड वॉर रूमला मी रात्री उशिरा आधी जाहीर न करता भेट दिली.”