CoronaVirus कोरोना योद्ध्यांचे पगार कापले; गुजरातमध्ये पॅरामेडिकल स्टाफ संपावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 15:06 IST2020-06-08T14:56:57+5:302020-06-08T15:06:28+5:30
अहमदाबादच्या एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांशी संबंधित कामे करणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफचे पगार कापण्यात आले आहेत.

CoronaVirus कोरोना योद्ध्यांचे पगार कापले; गुजरातमध्ये पॅरामेडिकल स्टाफ संपावर
एकीकडे कोरोना संकटासोबत सारा देश झुंजत असताना अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक तणावाला तोंड द्यावे लागत आहे. यातच गुजरातमध्ये एका कंपनीने कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्य़ाने नाराजीचे वातावरण असून त्यांनी संपाचे हत्यार उचलले आहे.
अहमदाबादच्या एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांशी संबंधित कामे करणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफचे पगार कापण्यात आले आहेत. पीपीपीनुसार हॉस्पिटलने या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यूडीएस (UDS) कंपनीने २० ते ३० टक्के पगार कपात करण्याचे पत्र हाती दिले आहे. याचसोबत ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन व्हावे लागत आहे, त्यांचाही पगार कापण्यात आला आहे.
यामुळे या कंपनीच्या कंत्राटावर राज्यभरात असलेले २५०० पॅरा मेडिकल कर्मचारी संपावर गेले आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. रविवारी राज्यात कोरोनाचे ४८० नवीन रुग्ण सापडले होते. यामुळे गुजरातमध्ये २००९७ रुग्ण झाले आहेत. तर ५२०५ रुग्ण उपचार घेत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणार
प्रशिक्षण विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
Very IMP! होम लोनच्या स्टेटसमध्ये मोठे बदल; बँकेत एकदा जरूर चेक करा
Unlock 1: कोरोनाच्या दहशतीत कार्यालये उघडण्याचा पहिला दिवस; मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत
UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम