coronavirus: देशात एकूण रुग्णसंख्या ३७ लाखांवर; कोरोना रुग्णांचा १.७६ टक्के मृत्यूदर जगात सर्वात कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:50 AM2020-09-03T03:50:24+5:302020-09-03T03:50:32+5:30
भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे.
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांचा जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात असून, तो १.७६ टक्के आहे. भारतात दर दहा लाखांमागे कोरोनामुळे ४८ जण मरण पावतात. हे प्रमाणही जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा कमी आहे. देशात कोरोनाचे बुधवारी ७८,३५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३७ लाखांहून अधिक झाली आहे
.
देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७६.९८ टक्के झाले असून, अशा व्यक्तींची एकूण संंख्या २९,०१,९०८ झाली आहे. जगामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ३.३ टक्के आहे. भारताच्या तुलनेत दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावणाºयांची संख्या ब्रिटन, ब्राझीलमध्ये १२ ते १३ पट अधिक आहे. जागतिक स्तरावर दर दहा लाख लोकांमागे ११० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
देशामध्ये कोरोनामुळे बुधवारी १,०४५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ६६,३३३ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३७,६९,५२३ झाली आहे. सध्या ८,०१,२८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण २१.२६ टक्के आहे.
भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ आॅगस्ट रोजी ओलांडला होता. त्यानंतर ही संख्या २३ आॅगस्ट रोजी ३० लाखांपेक्षा अधिक झाली होती.
कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,४१८, कर्नाटकात ५,८३७, आंध्र प्रदेशमध्ये ४,०५३, उत्तर प्रदेशमध्ये ३,५४२, पश्चिम बंगालमध्ये ३,२८३, गुजरातमध्ये ३,०३४, पंजाबमध्ये १,५१२ इतकी आहे.
कोरोना चाचण्यांची संख्या ४ कोटी ४३ लाखांवर
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर रोजी १०,१२,३६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,४३,३७,२०१ झाली आहे.