Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 11:10 AM2020-04-25T11:10:29+5:302020-04-25T12:24:29+5:30

Coronavirus : लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

Coronavirus 4 million people will not have mobile phone till may if lockdown continue SSS | Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात 3 मे पर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र याच दरम्यान फोनशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फोन विक्रीवर लावलेली बंदी आणि मोबाईल फोन दुरुस्त करणारी दुकाने बंद आहेत. बंदी हटवली गेली नाहीतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल अशी माहिती मिळत आहे.

इंडिया सेल्यूलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (ICEA) शुक्रवारी (24 एप्रिल) लॉकडाऊनमध्ये बंदी अशीच कायम राहिल्यास मे महिनाच्या शेवटी देशातील चार कोटी मोबाईल युजर्सचे मोबाईल न वापरण्यासारखे होतील अशी भीती व्यक्त केली आहे. आयसीईएने आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक लोकांशी संपर्क करून मोबाईल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे. तसेच मोबाईल नसेल तर अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहावे लागेल म्हणूनच मोबाईलचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा असं त्यांनी म्हटलं आहे. 

'भारतीय मोबाईल बाजारपेठ मोठी आहे. महिन्याला एकूण मोबाईल्सपैकी 0.25 टक्के प्रकरणे ही मोबाईल बंद होण्यासंदर्भातील असतात. सध्या भारतामध्ये 85 कोटी मोबाईल युजर्स आहेत. त्यामुळे या घडीला अडीच कोटी मोबाईल युजर्सचे फोन बिघडले असूनही त्यांना नवीन फोनची देखील खरेदी करता येत नाही. मोबाईल विक्रीवर घालण्यात आलेली बंदी आणि दुरुस्तीची दुकाने बंद असणे ही यामागील दोन प्रमुख कारणे आहेत' असं आयसीईएने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्मार्टफोन सध्याची गरज झाली असून लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्याच हातात तो हमखास दिसतो. अनेक ठिकाणी स्मार्टफोन हा ठेवला जातो. सध्या कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत असताना कोरोना व्हायरस स्मार्टफोनवर किती वेळ राहू शकतो याबाबत अनेक युजर्सकडून प्रश्न विचारला जात होता. या संदर्भात आता एक रिसर्च समोर आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या एका अभ्यासानुसार, ओरिजनल SARS-CoV एक ग्लास सर्फेसवर 96 तास म्हणजेच 4 दिवस जिवंत राहू शकतो. सार्सप्रमाणे कोरोना देखील ग्लास सर्फेसवर 4 दिवस जिवंत राहू शकतो. फक्त स्मार्टफोनच नाही तर स्मार्टवॉच, टॅबलेट किंवा लॅपटॉपसारख्या ग्लास सर्फेस असलेल्या उपकरणांवर देखील कोरोना जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्मार्टफोन हा वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

Web Title: Coronavirus 4 million people will not have mobile phone till may if lockdown continue SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.