CoronaVirus News: भारताला कोरोना लस कधी मिळणार, किती डोस उपलब्ध होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 06:12 AM2020-10-05T06:12:50+5:302020-10-05T06:48:14+5:30

CoronaVirus Vaccine News: कोरोना लसीचे वितरण, किंमत निश्चित करण्यात टास्क फोर्स व्यग्र; राज्यांची साठवणूक क्षमताही विचारात घेणार

CoronaVirus 400 500 mn vaccine doses for 25 crore people by July 2021 says Harsh Vardhan | CoronaVirus News: भारताला कोरोना लस कधी मिळणार, किती डोस उपलब्ध होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News: भारताला कोरोना लस कधी मिळणार, किती डोस उपलब्ध होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशातील २०-२५ कोटी लोकांंना देण्यासाठी जुलै २०२१ पर्यंत आम्ही कोविड लसीचे ४००-५०० दशलक्ष डोस मिळवणार आहोत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. ते ‘संडे संवाद’मध्ये सोशल मीडिया फॉलोअर्सशी संवाद साधताना म्हणाले की, लस सर्वप्रथम आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यास प्राधान्य असेल. त्यांनी लसीचे नाव, ती कुठून मिळणार, हे मात्र सांगितले नाही. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अदर पुनावाला नुकतेच म्हटले होते की, भारताच्या लोकसंख्येला ही लस देण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागतील.

डॉ. व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील पंतप्रधानांचा टास्क फोर्स (लस) देशासाठीच लस मिळवणे, तिचे वितरण व किमतीचे निकष ठरवण्यात व्यग्र आहे. राज्यांची लस साठवण्याची क्षमता व ती दिलेल्यांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्थाही टास्क फोर्स विचारात घेणार आहे.

अद्याप करार नाही
हैदराबादच्या भारत बायोटेकचा अपवाद वगळता भारताने लसीचा खात्रीने पुरवठा व्हावा, यासाठी कोणत्याही लस उत्पादकाशी अजून करार केलेला नाही. तज्ज्ञांनी म्हटले की, बाधा झालेल्या व्यक्तीला प्रत्येकी दोन डोसेसची गरज असेल व अशा प्रकारे देशाला साधारण ५०० दशलक्ष डोसेसची गरज असेल.

Web Title: CoronaVirus 400 500 mn vaccine doses for 25 crore people by July 2021 says Harsh Vardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.