Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 09:41 AM2020-03-30T09:41:11+5:302020-03-30T11:54:48+5:30
Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.
नवी दिल्ली – वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र भारतात फक्त 21 दिवसांचा नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.
केम्ब्रीज विद्यापीठातील एका भारतीय वंशाच्या संशोधकाने रिसर्च करून लॉकडाऊन संदर्भात एक नवीन गणितीय मॉडेल मांडलं आहे. त्यामध्ये भारताला 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन हवा आहे. त्यात वेळोवेळी थोडी सूटही देता येईल. हा लॉकडाऊन दोन महिने कायम ठेवला पाहिजे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ नये हेही आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. केम्ब्रीजमधील व्यावहारीक गणित आणि सैद्धांतिक भौतिकी विभागातील राजेश सिंह यांच्या मदतीने हा रिसर्च करण्यात आला आहे.
Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदतhttps://t.co/JweaJGQ3WS#CoronaLockdown#Google#sundarpichai
— Lokmat (@MiLOKMAT) March 30, 2020
रिसर्चमध्ये भारतात जो 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला गेला आहे तो फारसा परिणामकारक ठरणार नाही. कारण कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो. कोरोनावर उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. 'अॅज स्ट्रक्चर्ड इम्पॅक्ट ऑफ सोशल डिस्टन्सिंग ऑन द कोविड-19 एपिडेमिक इन इंडिया' असं या रिसर्च पेपरचं टायटल आहे. या रिसर्चमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उपाय, शाळा, कॉलेज, ऑफिस बंद करणं, लॉकडाऊन आणि त्याच्या कालावधीच्या परिणामकारकतेवर विचार मांडला गेला आहे. कोरोनावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा उपाय यशस्वी ठरू शकतो. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव उत्तम प्रकारे रोखता येईल असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पुढे वाढ करण्यात येईल, याबाबतचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले असून त्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. या बातम्यांना कुठलाही आधार नाही, असे सरकारनने स्पष्ट केले आहे. पीआयबीच्या ट्टविटनुसार, कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारकडून तसा कुठलाही प्रयत्न नसून या बातम्या वाचून मी स्वत: चिंताग्रस्त आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे गौबा यांनी म्हटलंय. यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेनीही या वृत्ताचे खंडन केले होते.
coronavirus: देशात 'लॉकडाऊन'चा कालावधी आणखी वाढणार? केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण https://t.co/CRgzgp4xg7
— Lokmat (@MiLOKMAT) March 30, 2020
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 33, 976 लोकांचा मृत्यू झाला असून 7,22,088 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 1,51,766 लोक बरे झाले आहेत. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी गुगलने मदतीचा हात दिला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 800 मिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 5 हजार 900 कोटींची मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत
Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण
coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर
Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी