coronavirus: आग्राकडे निघालेल्या ५ मजुरांचा ट्रक अपघातात मृत्यू, ११ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:27 AM2020-05-11T01:27:06+5:302020-05-11T01:27:35+5:30

हैदराबाद येथून आग्रा शहराकडे निघालेल्या ट्रकला उत्तर प्रदेशात अपघात झाला. यामध्ये ५ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. शिवाय ११ जण जखमी झाले आहेत.

coronavirus: 5 workers killed, 11 injured in truck accident | coronavirus: आग्राकडे निघालेल्या ५ मजुरांचा ट्रक अपघातात मृत्यू, ११ जण जखमी

coronavirus: आग्राकडे निघालेल्या ५ मजुरांचा ट्रक अपघातात मृत्यू, ११ जण जखमी

Next

लखनौ : तेलंगणामधील हैदराबाद येथून आग्रा शहराकडे निघालेल्या ट्रकला उत्तर प्रदेशात अपघात झाला. यामध्ये ५ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. शिवाय ११ जण जखमी झाले आहेत.
हा ट्रक नरसिंगपूरजवळील पाथा या गावाजवळ पलटी झाला. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी सांगितले की, हा ट्रक आंबे घेऊन निघाला होता. यात १६ मजूर आणि २ ड्रायव्हर मिळून १८ जण प्रवास करीत होते. हे मजूर तेलंगणातून उत्तर प्रदेशातील मूळ गावाकडे परत निघाले होते.

गुजरातहून लखनौला आलेल्या रेल्वेमध्ये प्रवाशाचा मृतदेह
गुजरातवरून लखनौ येथे आलेल्या विशेष श्रमिक एक्सप्रेसमध्ये शनिवारी एक व्यक्ती मेलेल्या अवस्थेत आढळली आहे. जवळच्या रुग्णालयात तपासले असता ती मरण पावली असल्याचे निश्चित झाले. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, ही गाडी भावनगर जिल्ह्यातील ढोला येथून निघाली होती. यातील कुणी प्रवासी आजारी असण्याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. परंतु गाडी इथे पोहचली असता एका डब्यात एक व्यक्ती निपचित पडल्याचे समजले. या डब्यातील अन्य प्रवासी आधीच उतरले होते. तपासणीनंतर बलरामपूर रुग्णालयाने ही व्यक्ती मरण पावली आहे असे घोषित केले. याचे नाव कन्हैय्या (वय ३०) असून ते मूळचे सीतापूरचे आहेत.

जबलपूरजवळ २० डबे घसरले, जिवितहानी नाही
नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना घेऊन सुरतहून उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहराकडे निघालेल्या ‘श्रमिक विशेष’ रेल्वेगाडीचे २० डबे रविवारी मध्य प्रदेशात जबलपूरजवळ घसरले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, इटारसी-जबलपूर विभागात जबलपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या भितौनी स्टेशनजवळ ही घटना घडली. यानंतर तातडीने रेल्वेचे डबे जोडण्याचे काम करण्यात आले आणि रेल्वेगाडी मार्गस्थ झाली.

लॉकडाऊनच्या काळात देशभरात मजूर कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या मूळ गावी जाता यावे, यासाठी केंद्र सरकारने मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत रेल्वेने मजुरांना आपापल्या गावी पाठविण्यात येत आहे.

Web Title: coronavirus: 5 workers killed, 11 injured in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.