coronavirus: देशात दर मिनिटाला ५० नवे कोरोना रुग्ण! २४ तासांत ७२ हजारांहून अधिक बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 06:59 AM2021-04-02T06:59:23+5:302021-04-02T06:59:51+5:30

Coronavirus : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३३० वर पोहोचला. ११ ऑक्टोबर २०२० रोजीनंतर प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली आहे.

coronavirus: 50 new corona patients every minute in the country! More than 72,000 infected in 24 hours | coronavirus: देशात दर मिनिटाला ५० नवे कोरोना रुग्ण! २४ तासांत ७२ हजारांहून अधिक बाधित

coronavirus: देशात दर मिनिटाला ५० नवे कोरोना रुग्ण! २४ तासांत ७२ हजारांहून अधिक बाधित

Next

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३३० वर पोहोचला. ११ ऑक्टोबर २०२० रोजीनंतर प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली आहे. ४५९ बाधितांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला असून ११६ दिवसांतला हा उच्चांक आहे. ही आकडेवारी पाहता, देशात दर मिनिटाला ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याचे दिसते. एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली. बाधितांची संख्या सतत वाढण्याचा गुरुवारी सलग २२वा दिवस होता.  

मुंबईत एका महिन्यात ४७५ टक्क्यांनी वाढ 
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात मुंबईमध्ये तब्बल ४७५ टक्क्यांनी बाधितांमध्ये वाढ झाली. मार्चमध्ये मुंबईत ८८ हजार ७१० बाधितांची नोंद झाली. जानेवारी आणि फेब्रुवारीत हीच संख्या अनुक्रमे १८ हजार ३५९ आणि १६ हजार ३२८ अशी होती.

Web Title: coronavirus: 50 new corona patients every minute in the country! More than 72,000 infected in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.