coronavirus: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:14 AM2020-05-20T10:14:20+5:302020-05-20T10:25:47+5:30
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक पातळीवर वाढ होत आहे. सोमवारी एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी तब्बल पाच हजार ६११ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या आकडेवारीनुसार मंगळवारी देशभरात कोरोनाचे पाच हजार ६११ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात आढळलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तसेच एका दिवसात सर्वाधिक सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर मंगळवारी दिवसभरात देशामध्ये १४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे १ लाख ६ हजार ७५० रुग्ण सापडले आहे. पैकी ३ हजार ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रात्प आकडेवारीनुसार सध्या देशात ६१ हजार १४९ रुग्ण आहेत.
संबंधित बातम्या