CoronaVirus News:देशात एका दिवसात आढळले कोरोनाचे ६६,९९९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:42 AM2020-08-14T02:42:50+5:302020-08-14T02:43:01+5:30
संसर्गाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण घटून ते आता १.९६ टक्क्यावर आले आहे
नवी दिल्ली : देशात गुरुवारी कोरोनाचे ६६,९९९ नवे रुग्ण आढळून आले, ही एका दिवसात आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९४२ जण मरण पावले असून, त्यांची एकूण संख्या ४७,०३३ झाली आहे. या संसर्गाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण घटून ते आता १.९६ टक्क्यावर आले आहे.
6,53,622
रुग्णांवर उपचार सुरू असून, त्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक म्हणजे
16,95,982
इतकी आहे. केंद्रीय आरोग्य खात्यानुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या
23,96,637
आहे. यातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७०.७७ टक्के झाले. देशात ७ आॅगस्ट रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर होती.
१२ दिवसांत (बुधवारपर्यंत) देशात
6,33,650
नवे कोरोना रुग्ण आढळून
आले होते. गेल्या आठवड्यात
दररोज सरासरी
58,000
नवे रुग्ण सापडले आहेत व या कालावधीत हे प्रमाण जगभरात सर्वाधिक आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार क्रमवारीत जगात भारत तिसºया क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, तर
दुसºया क्रमांकावर ब्राझील आहे.
2.68
कोटींवर चाचण्या
इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १२ आॅगस्ट रोजी ८,३०,३९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे आता कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २,६८,४५,६८८ झाली आहे.