CoronaVirus News: पूर्ण बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आता ७० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:21 AM2020-08-13T03:21:02+5:302020-08-13T06:47:07+5:30

एकूण रुग्णसंख्या २३ लाख; ४६,०९१ जणांचा बळी

CoronaVirus 70 per cent corona patients in the country fully recovered | CoronaVirus News: पूर्ण बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आता ७० टक्क्यांवर

CoronaVirus News: पूर्ण बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आता ७० टक्क्यांवर

Next

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या २३ लाखांहून अधिक झाली आहे. या आजारामुळे आणखी ८३४ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या ४६,०९१ वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या २३,२९,६३८ असून, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १६,३९,५९९ झाली आहे. बुधवारी ५६,११० जण कोरोनातून बरे झाले. पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७०.३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. बुधवारी कोरोनाचे ६०,९६३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या १२ दिवसांत कोरोनाचे ६,३३,६५० नवे रुग्ण सापडले आहे.

देशात सध्या ६,४३,९४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संसर्गातून पूर्ण बरे झालेले व उपचार सुरू असलेले यांच्या संख्येत सध्या ९,९५,६५१ इतक्या संख्येचा फरक आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून, त्यातून रुग्णांचा शोध घेऊन वेळीच उपचार केल्यामुळे या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोरोना साथीचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आदी दहा राज्यांनी या संसर्गाचे रुग्ण शोधण्यावर व त्यांच्यावर वेळीच उपचार होण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.

देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण या दहा राज्यांतील आहेत, तसेच एकूण बळींपैकी ८२ टक्के जणांचा मृत्यू या दहा राज्यांत झाला होता.

कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २ कोटी ६० लाखांवर

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी ७,३३,४४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता २,६०,१५,२९७ वर पोहोचली आहे.

बिहारमध्ये दर दहा लाखाला कोरोना चाचण्यांचे प्रमाण आहे
९,१८०
हेच प्रमाण गुजरातमध्ये
१४,९७३
उत्तर प्रदेशमध्ये
१४,२६६
पश्चिम बंगालमध्ये
११,६८३
तेलंगणामध्ये
१६,७८८
आहे, तर राष्ट्रीय स्तरावर दर
दहा लाखांमागे कोरोना चाचण्यांचे प्रमाण १८,९६८ आहे.

Web Title: CoronaVirus 70 per cent corona patients in the country fully recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.