Coronavirus : गुड न्यूज! तब्बल 705 रुग्ण एकाच दिवशी झाले बरे; ठरला आजपर्यंतचा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:09 PM2020-04-21T16:09:39+5:302020-04-21T16:32:22+5:30
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहचली आहे. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 759 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3252 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 18 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1 हजार 336 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहचली आहे. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 759 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3252 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
देशात आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली आहे. सोमवारी (20 एप्रिल) या एका दिवशी तब्बल 705 रुग्ण बरे झाले आहेत. एकाच दिवशी ठीक होणाऱ्यांचा हा उच्चांक आहे. अनेक जण कोरोनाला हरवत आहेत. 15 एप्रिल रोजी 183 रुग्ण बरे झाले होते. त्यानंतर पुढच्या दिवशी 16 एप्रिल रोजी ही संख्या वाढून 260 वर पोहचली. 17 एप्रिल रोजी 243 जणांनी, 18 एप्रिल रोजी 239 जणांनी तर 19 एप्रिल रोजी 316 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात दिली. त्यानंतर 20 एप्रिल रोजी तब्बल 705 रुग्ण बरे झाल्याने रेकॉर्ड झाला आहे.
#IndiaFightsCorona देशभरात गेल्या 24 तासांत 47 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण बातमी साठी क्लिक करा-https://t.co/a7wqClmypbpic.twitter.com/sFNKdBW1g6
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2020
महाराष्ट्रात 572 जणांनी, दिल्लीत 431 जणांनी तर केरळमध्ये 408 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर बिहारमध्ये 113 पैकी 42 रुग्ण आता बरे झालेत. तर उत्तर प्रदेशात 1184 पैकी 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तामिळनाडू 457, राजस्थान 205, तेलंगणा 190, मध्य प्रदेश 127, गुजरात 131 आणि हरियाणामध्ये 127 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांमध्ये केरळ राज्य आघाडीवर आहे. देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत. 19 एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात सरासरी 7.5 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे. तत्पूर्वी त्यासाठी केवळ 3 दिवस लागत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली होती.
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरलीhttps://t.co/y315r66fu5#coronavirusinindia#CoronaUpdatesInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2020
गोव्यात मार्चपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. 23 राज्यांमधील 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. 18 जिल्ह्यांमध्य हा वेग 8 ते 15 दिवसांवर गेला आहे तर काही राज्यांमध्ये 20 दिवस लागतात. महत्त्वाचे म्हणजे ओडिशा व केरळमध्ये 30 दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट झाल्याने आरोग्य मंत्रालयास मोठा दिलासा मिळाला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख 30 हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे 6 लाख 38 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने 1 लाख 66 हजार जणांचा बळीही घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : Zoom ची भीती वाटते?, लॉकडाऊनमध्ये 'हे' अॅप्स वापरुन घ्या Video कॉलिंगची मजा
Coronavirus : बापरे! भूक भागवण्यासाठी मुलं खातात बेडूक, जाणून घ्या व्हायरल Video मागचं सत्य
Coronavirus : ... तर चीनला मोठा फटका बसणार, तब्बल 1000 कंपन्या भारतात येणार
Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली