coronavirus : देशभरात एकाच दिवसात वाढले 708 रुग्ण, कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:22 PM2020-04-06T20:22:35+5:302020-04-06T20:36:53+5:30
आज एकाच दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 708 नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या 24 तासांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबधितांची वेगाने वाढत आहे. आज एकाच दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 708 नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या 24 तासांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 4281 वर पोहोचला आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 851 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 318 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर तामिळनाडू आणि दिल्लीमध्येही रुग्णांचा आकडा 500च्या वर पोहोचला आहे.
Increase of 704 #COVID19 cases & 28 deaths in the last 24 hours, the biggest rise so far in India; India's positive cases at 4281 (including 3851 active cases, 318 cured/discharged/migrated people and 111 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/tghFzXH3EN
— ANI (@ANI) April 6, 2020
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपोययोजना सुरु आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे.
शाळा, कॉलेज उघडण्याचा निर्णय १४ एप्रिलनंतरच
कोरोनामुळे बंद केलेली देशभरातील शाळा-कॉलेजे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलला संपल्यावर परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेऊनच केला जाऊ शकेल, असे केंद्रीय मानवसंधान विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांनी म्ह्टले आहे. ते म्हणाले की, सरकारच्या दृष्टीने विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा ही सर्वोच्च बाब आहे. १४ एप्रिलनंतरही शाळा-कॉलेजे बंद ठेवावी लागली तरी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.