CoronaVirus News: देशभरात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६७ लाखांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 03:20 AM2020-10-08T03:20:26+5:302020-10-08T03:20:44+5:30

CoronaVirus News: ५७ लाख लोक बरे झाले; आतापर्यंत १,०४,५५५ जणांचा बळी

CoronaVirus 72,049 New COVID 19 Cases Take India’s Tally to Over 67 Lakh | CoronaVirus News: देशभरात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६७ लाखांहून अधिक

CoronaVirus News: देशभरात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६७ लाखांहून अधिक

googlenewsNext

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे ७२,०४९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ६७.५७ लाख झाली आहे, तर ५७,४४,६९३ जण या संसर्गातून बरे झाले असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८५.०२ टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आणखी ९८६ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,०४,५५५ झाला आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६७,५७, १३१ आहे, तर बरे झालेल्यांचा आकडा ५७,४४,६९३ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५५ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. देशात सध्या ९,०७,८८३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १३.४४ टक्के इतके आहे. देशात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा ४८ लाखांनी अधिक आहे.

भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा पल्ला ७ आॅगस्ट रोजी, ३० लाखांचा पल्ला २३ आॅगस्टला, ४० लाखांचा टप्पा ५ सप्टेंबरला व ५० लाखांचा टप्पा १५ सप्टेंबरला ओलांडला. त्यानंतर १२ दिवसांनी या संख्येने ६० लाखांचा टप्पा पार केला. कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,९१७, कर्नाटकमध्ये ९,४६१, उत्तर प्रदेशमध्ये ६,१५३, आंध्र प्रदेशमध्ये ६,०५२, दिल्लीत ५,३१८, पश्चिम बंगालमध्ये ५,३१८, पंजाबमध्ये ३,६७९, गुजरातमध्ये ३,५१९ आहे. या बळींपैकी ७० टक्के लोक एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त होते.

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या अमेरिकेमध्ये ७७ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतातील कोरोना रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांनी कमी आहे. या क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या ब्राझीलमध्ये ४९ लाख कोरोना रुग्ण आहेत.

कोरोना चाचण्यांची संख्या ८ कोटी २२ लाख
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ६ आॅक्टोबर रोजी ११,९९,८५७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशात आतापर्यंत पार पडलेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ८,२२,७१,६५४ झाली आहे.

Web Title: CoronaVirus 72,049 New COVID 19 Cases Take India’s Tally to Over 67 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.