coronavirus: कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर ७७ टक्के जनता समाधानी : सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 01:27 PM2020-08-08T13:27:21+5:302020-08-08T13:38:13+5:30
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बघता बघता २० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आपातकालीन परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा एक सर्वे समोर आला आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या देशातील परिस्थिती दिवसागणित चिंताजनक होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बघता बघता २० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आपातकालीन परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा एक सर्वे समोर आला आहे. १९ राज्यांमध्ये झालेल्या या सर्व्हेत सहभागी झालेल्या ४८ टक्के लोकांनी कोरोनाविरोधात मोदी सरकारने चांगलं काम केल्याचे मत व्यक्त केले. तर २९ टक्के लोकांनी कोरोनाला रोखण्यात खूप चांगली कामगिरी बजावल्याचे सांगितले.
आज तक-इंडिया टुडे समुहासाठी मूड ऑफ द नेशन अंतर्गत हा सर्वे कर्वी इनसाइ़ड लिमिटेडने केला. देशातील ६७ टक्के लोक कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे या सर्वेमध्ये दिसून आले. तर १८ टक्के लोकांनी कोरोनानाकाळातील मोदी सरकारची कामगिरी सरासरी असल्याचे सांगितले. उर्वरित ५ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटकाळातील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले.
कोरोनामुळे किती नुकसान झाले याचे उत्तर देताना २२ टक्के लोकांनी व्यवसाय आणि नोकरीमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले. तर ६३ टक्के लोकांनी कोरोनाच्या संकटानंतर आपल्या आर्थिक कमाईत घट झाल्याचे सांगितले. तर १५ टक्के लोकांनी आपल्या कमाईत कोणतीही घट झाली नसल्याचे सांगितले. केवळ १ टक्का लोकांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपली कमाई वाढल्याचे सांगितले.
लॉकडाऊनमुळे लोकांचे आयुष्य वाचवता येऊ शकेल का या प्रश्नाचे उत्तर देताना ३४ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. तर ३८ टक्के लोकांनी आर्थिक अडचणी आल्याचे मान्य करत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाऊन उपयुक्त ठरल्याचे सांगितले. तर २५ टक्के लोकांनी याबाबत नकारार्थी उत्तर दिले. ३ टक्के लोकांनी याबाबत काहीही मत व्यक्त केले नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी