coronavirus: चिंताजनक! देशातील या पाच राज्यांतच कोरोनाचे ८० टक्के रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:02 AM2020-05-12T05:02:21+5:302020-05-12T05:16:31+5:30
महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : देशातील पाच राज्ये आणि अर्धा डझन शहरांतच कोरोना विषाणूचे (कोविड-१९) ८० टक्के रुग्ण आहेत. केंद्र सरकार याच राज्यांवर लक्ष केंद्रीत करून कोरोना वेगाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. केरळ मॉडेलचा अवलंब करून कोविड-१९ विरोधातील युद्ध जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे. ही राज्ये व या शहरांत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या तुकड्या पाठवल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जी राज्ये कोरोनामुक्त आहेत त्यांच्यावरही केंद्राचे लक्ष आहे. या राज्यांत गोवा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि केंद्रशासित प्रदेशांत अंदमान व निकोबार, दादरा व नगरहवेलीचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी ईशान्य भारतातील राज्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या राज्यांनी त्यांच्याकडे येणारे विदेशी नागरिक व इतर राज्यांतून येणाऱ्यांचे होम क्वारंटाईन व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून घ्यावे. राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत.
05 राज्यांत आणि अर्धा डझन शहरांत केंद्राची आयसीएमटीची तुकडी गेली आहे तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा सल्ला दिला गेला आहे. ज्या राज्यांत कोरोनामुळे मृत्यू जास्त झाले तेथे कोरोनाचे रुग्ण कमी दाखवले गेले आहेत. स्थिती तेथे जास्त काळजीची आहे. कारण तेथून आकडेवारी अचूक येत नाही.
185 लोकांचा पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे व तेथे १९३९ रुग्ण असल्याचे सांगितले जाते. आंध्र प्रदेशमध्ये १९८० रुग्ण व ४५ मृत्यू आहेत. राजस्थानात पश्चिम बंगालपेक्षा दुपट्ट रुग्ण असून मृत्यू १०७ आहेत. तमिळनाडूत ४७ तर दिल्लीत ७३ मृत्यू झाले आहेत.