coronavirus: महाराष्ट्रासह ९ राज्यांत कोरोनामुळे ८०% मृत्यू, देशातील परिस्थिती नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 04:43 AM2020-07-10T04:43:55+5:302020-07-10T04:44:48+5:30
भारतात कोरोना विषाणूचा सामूहिक फैलाव झाला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला. मंत्री समुहाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर, नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे सहभागी झाले.
नवी दिल्ली : भारतात कोविड-१९ ने एकूण मृत्यूच्या ८० टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यात झाले आहेत. जगातील पाच प्रभावित देशांमध्ये भारतात मृत्यु आणि बाधितांची आकडेवारी कमी असल्याबाबत मंत्री समूहाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. वर्तमान स्थितीवर मात करण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले.
भारतात कोरोना विषाणूचा सामूहिक फैलाव झाला नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला. मंत्री समुहाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर, नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे सहभागी झाले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर १ टक्क्यांहून कमी करण्यासाठी सरकार नियोजन करीत आहे. हा दर कमी करण्यासाठी जिल्हा पातळीपर्यंत रुग्णांचा शोध घेणे, त्यांचा इतिहास तपासणे, वैद्यकीय उपचाराचे प्राथमिक उपाय गावपातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देशातील लोकसंख्येच्या अनुषंगाने विचार केला, तर भारतात दर १० लाख लोकसंख्येमागे केवळ ५३८ कोरोनारुग्ण आढळत आहेत. देशातील कोरोनामुक्तीचा दर हा ६२.०८ टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. देशातील मृत्यूदर २.७५ टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात २१.८ दिवसांनी कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. काही स्थानिक भागामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे.
नियंत्रण क्षेत्रांची संख्या कमी करण्याचे निर्देश
3,77,737
देशात सध्या विलगीकरण खाटा उपलब्ध आहेत. ३९ हजार ८२० आयसीयू खाटा, तर आॅक्सिजन असलेल्या खाटांची संख्या ४२ हजार ४१५ एवढी आहे. व्हेंटिलेटरयुक्त २० हजार ४७ खाटा उपलब्ध आहेत.
21,435
व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय आता पर्यंत देशातील राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना ४५ लाख ४२ हजार ८७ पीपीई किट, तसेच ६२ लाख १३ हजार ४४ एन-९५ मास्क उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.