Coronavirus: निर्दयी! ९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले आई-वडील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 11:19 AM2020-06-01T11:19:03+5:302020-06-01T11:19:26+5:30
कोरोनाच्या या काळात नात्यांचीही परीक्षा पाहायला मिळत आहे. मृत्यूची दहशत इतकी की, आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्यापासून दूर जाणं पसंत केले आहे.
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १९० हून अधिक देश जाळ्यात अडकले आहेत. आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर साडेतीन लाखांपर्यंत लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला आहे. लोकांना कोरोनाच्या दहशतीखाली जगावं लागत आहे.
कोरोनाच्या या काळात नात्यांचीही परीक्षा पाहायला मिळत आहे. मृत्यूची दहशत इतकी की, आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्यापासून दूर जाणं पसंत केले आहे. रामपूरच्या मिलक परिसरात उपचारादरम्यान ९ महिन्याच्या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. या मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ज्यावेळी त्याच्या आई-वडिलांना याची माहिती मिळाली त्यांनी या चिमुकल्याला हॉस्पिटलमध्येच सोडून गेले, याचा मृतदेह घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी संपर्क केला असता मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर एम्समधील लोकांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
या ९ महिन्याच्या चिमुकल्याच्या डोक्याला गाठ होती, त्याच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी ऑपरेशनबाबत सांगितले, लॉकडाऊनमुळे रुटीन चेकअपसाठी दिल्लीला जाता येत नव्हते. रामपूरच्या एका नर्सिंग होमने मुलाला दिल्लीला घेऊन जाण्याची सूचना केली. त्यानंतर या मुलाला आई-वडिलांनी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल केले. ऑपरेशनपूर्वी केलेल्या तपासणीत २९ मे रोजी आई-वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मुलगा कोरोना संक्रमित असल्याची माहिती मिळताच आई-वडिलांनी एम्समधून पळ काढला. एम्स प्रशासनाने रामपूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर या चिमुकल्याचे आई-वडील गावातच असल्याचं कळालं. त्याच्या वडिलांनी लिहून दिलं की, माझ्या मुलाचे अंत्यसंस्कार एम्स प्रशासनाने करावे. त्यानंतर या चिमुकल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामपूर जिल्हाधिकारी आंजनेय कुमार सिंह यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवी किंमत
१ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं
जगप्रसिद्ध व्हिडीओ साइट Youtube ने त्यांचा लोगो काळा केला, जाणून घ्या काय आहे कारण?
७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!