Coronavirus: सुमारे ६० लाख लोकांनी केली कोरोनावर मात; शनिवारी सापडले ७३,२७२ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:24 AM2020-10-11T01:24:18+5:302020-10-11T06:54:31+5:30
Coronavirus in India News: एकूण ६९ लाख ७९ हजार रुग्ण । बळींचा आकडा १,०७,४१६
नवी दिल्ली : देशात सुमारे ६० लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी कोरोनाचे ७३,२७२ नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ६९ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. या आजारामुळे आणखी ९२६ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,०७,४१६ झाली आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या 69,79,423 तर बरे झालेल्यांची संख्या 59,88,822 वर पोहोचली. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत 85.81% आहे. उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सलग दुसºया दिवशीही 9,00,000 पेक्षा कमी होती. शनिवारी ही 8,83,185
इतकी होती. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 12.65% टक्के आहे.
जगभरातील रुग्णसंख्या 03.71 कोटींपेक्षा अधिक झाली. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिकेमध्ये
78.94 लाख रुग्ण आहेत. दुसºया क्रमांकावरील भारतामधील रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा 09.00 लाखांनी कमी आहे, तर तिसºया स्थानावरील ब्राझीलमध्ये 50.57 लाख रुग्ण आहेत.
देशामध्ये रुग्णसंख्येने 20,00,000 चा टप्पा ७ आॅगस्ट रोजी गाठला. त्यानंतर 30,00,000 चा पल्ला २३ आॅगस्ट रोजी पार केला. त्यानंतर रुग्णसंख्या ४ सप्टेंबर रोजी 40,00,000 १६ सप्टेंबर रोजी 50,00,000 २८ सप्टेंबर रोजी 60,00,000 झाली.