coronavirus:"धन्य ते यूपी सरकार आणि धन्य ते पंतप्रधान मोदी,’’ भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा उद्वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 01:08 PM2021-04-29T13:08:40+5:302021-04-29T13:17:49+5:30

coronavirus in India : कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना रुग्णालयामधील उपचारच नाही तर रुग्णालयात दाखल होणेही अवघड बनले आहे. केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर अनेक बड्या लोकांनाही उपचारांसाठी ताटकळत राहावे लागत आहे.

coronavirus: After the death of the BJP MLA Kesar Singh Gangwar, His family Criticize Uttar Pradesh government & PM Narendra Modi | coronavirus:"धन्य ते यूपी सरकार आणि धन्य ते पंतप्रधान मोदी,’’ भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा उद्वेग

coronavirus:"धन्य ते यूपी सरकार आणि धन्य ते पंतप्रधान मोदी,’’ भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा उद्वेग

Next

लखनौ - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा संपूर्ण देशाला बसला आहे.  (coronavirus in India)या तडाख्याने देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या पातळीवरील प्रयत्न अपुरे पडत आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना रुग्णालयामधील उपचारच नाही तर रुग्णालयात दाखल होणेही अवघड बनले आहे. केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर अनेक बड्या लोकांनाही उपचारांसाठी ताटकळत राहावे लागत आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात तर आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असून, येथील एका भाजपा आमदाराचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात संतप्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  ( After the death of the BJP MLA Kesar Singh Gangwar, His family Criticize Uttar Pradesh government & PM Narendra Modi)

उत्तर प्रदेशमधील नवाबगंज येथील भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे नुकताच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर गंगवार यांचे कुटुंबीय राज्यातील आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. केसर सिंह गंगवार यांचे पुत्र विशाल गंगवार यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहून राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला आहे. 

या फेसबुक पोस्टमध्ये विशाल गंगवार लिहितात की, उत्तर प्रदेशमधील सरकार आपल्याच आमदारावरही उपचार करू शकत नाही आहे. मी अनेकदा मुख्यंत्र्यांच्या कार्यालयात फोन केला. मात्र तिथून कुणी प्रतिसादच दिला नाही. एका आमदाराची अशी परिस्थिती येत असेल, तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल याची कल्पनाच करवत नाही. धन्य ते यूपी सरकार आणि धन्य ते नरेंद्र मोदी, असा उद्वेग विशाल गंगवार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) बरेलीतील (bareilly) भाजपा आमदार केसर सिंह गंगवार (BJP Kesar Singh Gangwar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, 18 एप्रिल रोजीच या आमदारांनी डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून परिस्थिती कळवली होती. तसेच, मला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही केली होती.

Web Title: coronavirus: After the death of the BJP MLA Kesar Singh Gangwar, His family Criticize Uttar Pradesh government & PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.