दुःखाचा डोंगर! कोरोनामुळे आईचा मृत्यू, 4 मुलं झाली अनाथ; 7 वर्षांच्या अंकुशवर आली कुटुंबाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:34 PM2021-05-25T12:34:27+5:302021-05-25T12:37:41+5:30

आईच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबातील काजल, रूबी, रेनू उर्फ सुबी आणि अंकुश अनाथ झाले आहेत. सात वर्षांच्या अंकुशवर खेळण्याच्या वयातच आईचे श्राद्ध कर्म करण्याबरोबर, आपल्या भावंडांच्या पालन-पोषणाचीही मोठी जबाबदारी आली आहे.

CoronaVirus After mother death due to corona 7 year old to look after his siblings ballia | दुःखाचा डोंगर! कोरोनामुळे आईचा मृत्यू, 4 मुलं झाली अनाथ; 7 वर्षांच्या अंकुशवर आली कुटुंबाची जबाबदारी

दुःखाचा डोंगर! कोरोनामुळे आईचा मृत्यू, 4 मुलं झाली अनाथ; 7 वर्षांच्या अंकुशवर आली कुटुंबाची जबाबदारी

googlenewsNext

बलिया - उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बैरिया तालुक्यात असलेल्या दलनछपरा गावात कोरोनाने एकाच कुटुंबातील चार मुलांना अनाथ केले. यामुळे, सध्या शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असेलल्या अवघ्या सात वर्षांच्या अंकुशवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. आता त्याला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या आईचा तेरावाही करायचा आहे आणि आपल्या तीन बहीण-भावांचा सांभाळही करायचा आहे. (CoronaVirus After mother death due to corona 7 year old to look after his siblings ballia)

कोरोनाच्या थैमानाने जिल्ह्यातील बहुतेरे कुटुंबातील हसते-खेळते वातावरण नष्ट केले. बिहारच्या सीमेपासून साधारणपणे 50-55 किलोमिटर अंतरावर असलेल्या दलनछपरा गावातील अंकुशचे वडिल संतोष पासवान यांचा तीन वर्षांपूर्वीच कॅन्सरने मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी अंकुशच्या आईचाही कोरोनाने बळी घेतला.

CoronaVirus News: तुमची आई गेली! रुग्णवाहिका चालकाला रात्री आला कॉल; त्यानंतर त्यानं जे केलं ते वाचून कौतुक कराल

आईच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबातील काजल, रूबी, रेनू उर्फ सुबी आणि अंकुश अनाथ झाले आहेत. सात वर्षांच्या अंकुशवर खेळण्याच्या वयातच आईचे श्राद्ध कर्म करण्याबरोबर, आपल्या भावंडांच्या पालन-पोषणाचीही मोठी जबाबदारी आली आहे. मात्र, अंकुशही कुटुंबाची जबाबदारी उचलायला तयार आहे. या कौवळ्या वयातही त्याने हिंमत हारलेली नाही. तो म्हणतो, की आपल्या सारख्यांकडून मदत मागून पुढील शिक्षण पूर्ण करू आणि पोलीस होऊ. मात्र, अंकुशच्या बहिणींचे म्हणणे आहे, की आता सर्व काही देवाच्याच हाती आहे. आम्ही दुसऱ्यांच्या शेतात मोल मजुरी करून दिवस काढू, असे त्या म्हणतात.

दिलासादायक! राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षाही खाली

आजीच्या विधवा पेन्शनवर चालते घर - 
या प्रकरणात जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेसंदर्भात जिल्हाधिकारी अदिति सिंह यांना विचारले असता, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने सायंकाळी जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे, की या चारही अनाथ मुलांचा सांभाळ त्यांची आजी फुलेश्वरी देवी विधवा पेन्शनच्या स्वरुपात मिळणाऱ्या पैशांतून करतात. महत्वाचे म्हणजे, राज्यात पात्र, महिलांना दर महा विधवा पेन्शनच्या रुपात केवळ 500 रुपयेच मिळतात. 

Web Title: CoronaVirus After mother death due to corona 7 year old to look after his siblings ballia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.