CoronaVirus : राजनाथ सिंहांनंतर आता 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण, स्वतःला केलं आयसोलेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:52 PM2022-01-10T19:52:20+5:302022-01-10T19:54:00+5:30
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
नवी दिल्ली - देशाचे संरक्षण मंत्री तथा भाजप नेते राजनाथ सिंह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राजनाथ सिंहांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली, तर बिहारच्या सीएमओने मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.
देशभरात 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित -
कोरोना संक्रमित आढळून आल्यानंतर, आपण स्वतःला आयसोलेट केले असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
राजनाथ सिंहांचे ट्वीट -
I have tested positive for Corona today with mild symptoms. I am under home quarantine. I request everyone who have recently come in my contact to isolate themselves and get tested.
— Rajnath Singh (@rajnathsingh) January 10, 2022
राजनाथ सिंहांनी ट्विट केले आहे की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केले आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो, की त्यांनीही स्वत:ला आयसोलेट करावे आणि आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.'
बिहार सीएमओचे ट्विट -
माननीय मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार कोरोना जाँच में पॉज़िटिव पाये गए हैं। चिकित्सकों की सलाह पर वह होम आइसोलेशन में हैं। उन्होंने सभी से कोविड अनुकूल सावधानियां बरतने की अपील की है।
— CMO Bihar (@officecmbihar) January 10, 2022
बिहार सीएमओने ट्विट करत म्हटले आहे, की मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी सर्वांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.