Coronavirus : कोरोनानंतर आता नियोकोव व्हेरिएंटची दहशत?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:27 AM2022-01-30T06:27:24+5:302022-01-30T06:27:51+5:30
Coronavirus: गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची चर्चा आहे. या व्हेरिएंटचा धोका कमी होत असतानाच आता नियोकोव या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे. अजून हा व्हेरिएंट बाल्यावस्थेत आहे. त्याचा धोका कितपत याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची चर्चा आहे. या व्हेरिएंटचा धोका कमी होत असतानाच आता नियोकोव या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे. अजून हा व्हेरिएंट बाल्यावस्थेत आहे. त्याचा धोका कितपत याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत.
तज्ज्ञांचा दावा...
- नियोकोव कोणत्याही प्रकारच्या प्रतिकारशक्तीला चकवू शकतात.
- कोरोनाप्रतिबंधक लसीलाही हा व्हेरिएंट बधणारा नाही.
- परंतु अजून या व्हेरिएंटचा पुरेसा अभ्यास होणे बाकी असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कुठे लागला शोध?
- रशियन वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानुसार नियोकोव हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतील
वटवाघळांमध्ये आढळून आला आहे.
- वटवाघळांमध्ये या व्हेरिएंटचा फैलाव जोमाने होत असल्याने माणसांनाही त्याचा धोका असल्याचे मानले जात आहे.
जगाला किती धोकादायक?
-अद्याप तरी नियोकोवची लागण झालेल्या एकाही बाधिताची नोंद जगात झालेली नाही.
- नव्या व्हेरिएंटचा फैलाव सर्वत्र होण्यासाठी त्याच्यात आणखी एक
उत्परिवर्तन होणे बाकी आहे.
- त्यामुळे तूर्तास तरी नियोकोव जगाला किती धोकादायक आहे, हे ठामपणे सांगता येणे कठीण आहे.
-सध्या ओमायक्रॉनमुळे जग त्रस्त आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कमी धोकादायक आहे, हेच दिलासादायक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे...
- सद्य:स्थितीत नियोकोवविषयी ‘थांबा आणि वाट पहा’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे धोरण आहे.
- नियोकोववर अजून अभ्यास सुरू असल्याने त्यास ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या यादीमध्ये संघटनेने अजून समाविष्ट केलेेले नाही.
- आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने अल्फा, बिटा, गॅमा, डेल्टा आणि ओमायक्रॉन यांना ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ (चिंताजनक व्हेरिएंट) या यादीत समाविष्ट केले आहे.