Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:49 PM2020-04-07T16:49:40+5:302020-04-07T16:55:39+5:30
Coronavirus : कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत.
नवी दिल्ली - चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत.
कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरही कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुटुंबापासून दूर असलेल्या एम्सच्या डॉ. अंबिका यांनी हे कोविड – 19 विरुद्ध युद्ध असल्याचं सांगितलं आहे. हे सांगताना कुटुंबियांच्या आठवणीने त्या भावुक झाल्या आहेत.
#WATCH Dr Ambika, who is posted at #COVID19 treatment ward of Delhi AIIMS, breaks down while speaking about her professional challenges amid coronavirus pandemic. pic.twitter.com/erNNUIh7Il
— ANI (@ANI) April 6, 2020
'कोविड – 19 च्या विरोधात हे युद्ध आहे. कुटुंबियांशी फोनवर बोलताना कधीकधी भीती वाटते... आपण घरापासून दूर आहोत. ते जर आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करायला जाता येणार नाही, त्यांना भेटता येणार नाही' असं अंबिका यांनी सांगितलं. कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले. तसेच 'असं असतानाही घरच्यांनी कधीच मला घरी ये म्हणून सांगितलं नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही. सेवा करत राहा असंच ते मला नेहमी सांगत' असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यूhttps://t.co/9wBAptTidh#CoronaLockdown#France
— Lokmat (@MiLOKMAT) April 7, 2020
कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली आहे. विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 75,896 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 13,58,857 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,90,643 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारीhttps://t.co/A4dOAxdm2j#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 7, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू
Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी
Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा