CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 05:24 PM2021-05-04T17:24:35+5:302021-05-04T17:26:37+5:30

CoronaVirus: वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे, असे म्हटले जात आहे.

coronavirus aiims randeep guleria says that centre should impose strict lockdown in country | CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

CoronaVirus: “वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्य”

Next
ठळक मुद्देवीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही; कडक लॉकडाऊन अनिवार्यरुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यकतरच रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता - डॉ. गुलेरिया

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू होत आहे. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे, असे म्हटले जात आहे. (coronavirus aiims randeep guleria says that centre should impose strict lockdown in country)

कोरोना विषाणू असाच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा गुलेरिया यांनी यावेळी दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी देशातील सद्यस्थितीबाबत भीती व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि नियंत्रणासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून, कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आहे, असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा 

देशात आताच्या घडीला रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणे आणि मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे गुलेरियांनी यांनी सांगितले. आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होऊ शकते, असेही गुलेरिया यांनी नमूद केले. 

संकटात दिलासा! RIL च्या नफ्यात वाढ; २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार बोनस

तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता

भारतात युकेप्रमाणेच लॉकडाऊन लागू करावा लागेल. माणसाचं जीवन आणि त्याचा उदरनिर्वाह याची नीटपणे हाताळणी करण्यासंदर्भातील हा मुद्दा आहे. दररोज मजूरी करून पोट भरणाऱ्याचाही मुद्दा आहे. पण, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन आवश्यक आहे, असे गुलेरिया म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून, या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. 
 

Web Title: coronavirus aiims randeep guleria says that centre should impose strict lockdown in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.