Coronavirus : माहीच्या शहरात खळबळ उडाली; रिम्समधून सारे संशयित फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:12 PM2020-03-18T13:12:11+5:302020-03-18T13:24:14+5:30

भारतात कोरोना व्हायरस तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची शक्यता आहे. यापासून रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

Coronavirus: All suspects abscond from rims City of mahendra singh dhoni hrb | Coronavirus : माहीच्या शहरात खळबळ उडाली; रिम्समधून सारे संशयित फरार

Coronavirus : माहीच्या शहरात खळबळ उडाली; रिम्समधून सारे संशयित फरार

Next
ठळक मुद्देरिम्समध्ये परदेशातून आलेले आणि संशयित म्हणून सापडलेले ३२ जणांना भरती करण्यात आले होते. झारखंडमध्ये पळून गेलेले रुग्ण जर पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यामुळे हा रोग सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे. सर्वजण चाचणी दिल्यानंतर गायब झाले आहेत ते अद्याप सापडलेले नाहीत.

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या शहरामध्ये आज मोठी खळबळ उडाली आहे. येथील रिम्स हॉस्पिटलमधून ९० टक्के कोरोना संशयित पळून गेल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. हे सर्वजण चाचणी दिल्यानंतर गायब झाले आहेत ते अद्याप सापडलेले नाहीत.

भारतात कोरोना व्हायरस तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची शक्यता आहे. यापासून रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातही नागपूर, पुणे आणि पनवेलमध्ये असेच संशयित रुग्ण पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. देशात सर्वाधिक महाराष्ट्रातच कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

झारखंडमध्ये पळून गेलेले रुग्ण जर पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्यामुळे हा रोग सर्वत्र पसरण्याची शक्यता आहे. रांची हॉस्पिटलमधून पळालेले हे रुग्ण त्यांच्य घरीही सापडलेले नाहीत. हे सारे फरार झालेले असून रांची, रामगड, गिरीडीह, चतरा, गुमला, धनबाद आदी शहरांमधील आहेत. यामुळे आरोग्य विभागासह पोलिसांची पाचावर धारण बसली असून लोकांना त्यांनी सावध राहण्यास सांगितले आहे.

रिम्समध्ये परदेशातून आलेले आणि संशयित म्हणून सापडलेले ३२ जणांना भरती करण्यात आले होते. त्याना निरिक्षणासाठी ठेवलेले असताना यापैकी २९ जण पसार झाले आहेत. त्यांनी सॅम्पल दिलेले असून त्याचा अहवाल येईपर्यंतही ते थांबलेले नाहीत.

दरम्यान या सर्वांवर पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली असून शोध सुरु आहे. यापैकी जो रुग्ण पॉझिटीव्ह आढळेल त्याच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे. अशी कारवाई आग्रामध्ये करण्यात आली आहे. कारण या रुग्णाने इतरांच्या जिवालाही धोका निर्माण केला आहे, असे रिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: All suspects abscond from rims City of mahendra singh dhoni hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.