Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:08 AM2020-03-20T05:08:26+5:302020-03-20T05:09:06+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानंतर तर दोन ते चार आठवड्यांसाठी आमची गावे आणि शहरे ताबडतोब लॉकडाऊन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करू नये

Coronavirus: All villages, cities closed for two weeks, P. Chidambaram's Advice | Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना

Coronavirus : सर्व गावे, शहरे दोन आठवडे बंद ठेवा, चिदम्बरम यांची सूचना

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सगळी गावे आणि शहरे दोन ते चार आठवड्यांसाठी बंद (लॉक डाऊन) ठेवावीत, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी केले. भारतात कोरोना व्हायरसचे १८ नवे रुग्ण देशाच्या वेगवेगळ्या भागांत नोंदले गेल्यानंतर गुरुवारी देशातील एकूण रुग्णांची संख्या १६९ वर गेली, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.

चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, आतापर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार हा लोकांकडून लोकांकडे (कम्युनिटी ट्रान्समिशन) होण्याची तिसरी पायरी गाठली गेलेली नाही हे आयसीएमआरने ठरवून न घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीतून उघड झाले आहे. ही अशी वेळ आहे की, साथीचा फैलाव दुसऱ्या पायरीवरच रोखण्यासाठी तात्पुरते का असेना लोकांना घराबाहेर पडू देऊ नये. जी राज्ये केंद्र सरकारच्या पुढेच आहेत त्यांनी पुढे पडून आपापल्या गावांत व शहरांत लॉकडाऊन केले पाहिजे, असे चिदम्बरम म्हणाले.

ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानंतर तर दोन ते चार आठवड्यांसाठी आमची गावे आणि शहरे ताबडतोब लॉकडाऊन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करू नये.

मास्कचे उत्पादन वाढवण्याचे आदेश
केंद्र सरकारने देशातील अर्ध्या डझनपेक्षा जास्त शहरांना मास्क बनवणाºया कंपन्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांना उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने त्यांना अतिरिक्त उत्पादन खरेदी करण्याची हमी देत म्हटले की, त्यांनी आपल्या सगळ्या उत्पादनाच्या विक्रीबाबत निश्चिंत राहावे. सरकार त्यांना जेवढी आॅर्डर देईल तेवढा सगळा माल खरेदी केला जाईल.
 

Web Title: Coronavirus: All villages, cities closed for two weeks, P. Chidambaram's Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.