Coronavirus: रोज दहा लाख लसी देण्यासाठी ‘अपोलो’ची यंत्रणा सुसज्ज; आरोग्य सेवकांना देणार प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 04:39 AM2020-10-16T04:39:52+5:302020-10-16T07:03:49+5:30

१० हजार आरोग्य सेवकांना देणार ४ महिन्यांचे प्रशिक्षण

Coronavirus: Apollo equipped with one million vaccines per day; Training for health workers | Coronavirus: रोज दहा लाख लसी देण्यासाठी ‘अपोलो’ची यंत्रणा सुसज्ज; आरोग्य सेवकांना देणार प्रशिक्षण

Coronavirus: रोज दहा लाख लसी देण्यासाठी ‘अपोलो’ची यंत्रणा सुसज्ज; आरोग्य सेवकांना देणार प्रशिक्षण

Next

नवी दिल्ली : दररोज दहा लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचता येईल अशी यंत्रणा आम्ही सज्ज ठेवली आहे, असे अपोलो हॉस्पिटल्सने गुरुवारी जाहीर केले. अपोलो उद्योगसमूहाकडे शीतगृहांच्या सोयीसह औषधांच्या पुरवठ्यासाठी १९ सुसज्ज केंद्रे आहेत. या समुहाच्या मालकीची ७० रुग्णालये, ४००हून अधिक दवाखाने, ५०० आरोग्य केंद्रे, ४००० फार्मसी तसेच अपोलो टष्ट्वेटी फोर बाय सेव्हन हा ओमनी चॅनेल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

या लसीकरणासाठी दहा हजार आरोग्य सेवकांना चार महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपोलोची संलग्न कंपनी असलेल्या केइमेडकडे औषधांचा साठा करण्यासाठी शीतगृहांची मोठी साखळी व वितरणाची उत्तम यंत्रणा आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन शोभना कामिनेनी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लस विकत घेण्यासाठी खासगी क्षेत्राला परवानगी दिल्यास अपोलो हॉस्पिटल्स उत्पादकांकडून ही लस विकत घेऊन ती इच्छुक व्यक्तीला तसेच रुग्णाला टोचली जाईल. कोरोना लसीचा कोणाही व्यक्तीस केवळ एक डोस देऊन भागणार नाही. आणखी डोस द्यावे लागतील.

शीतगृहांच्या विस्ताराची योजना
कोरोना प्रतिबंधक लसीच्या साठवणूक व वितरणासाठी देशात किती शीतगृहे उपलब्ध होऊ शकतील याची चाचपणी यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या गटाने सुरू केली आहे. शीतगृहांच्या साखळीचा विस्ताराचीही योजना तज्ज्ञांचा हा गट तयार करत असल्याचे कळते. या गटामध्ये काही उपगटही नेमण्यात आले असून ते कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनापासून ते उत्पादनापर्यंत अनेक गोष्टींवर मंथन करत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १४ ऑक्टोबर रोजी 11.36 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे या चाचण्यांची एकूण संख्या 9.12 कोटी झाली आहे.

Web Title: Coronavirus: Apollo equipped with one million vaccines per day; Training for health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.