Coronavirus: काय सांगता! ‘अश्वगंधा’ करणार कोरोनावर मात?; दिल्ली आयआयटीने शोधलं उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:15 PM2020-05-19T13:15:25+5:302020-05-19T13:18:48+5:30
संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त आहे त्यात भारतात त्याच्या औषधाबद्दल एक चांगली बातमी आहे.
नवी दिल्ली - चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात शिरकाव केल्याने अनेक देशांसमोर कोरोना रोखण्याचं मोठं आव्हान उभं झालं आहे. आतापर्यंत ४८ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर जगभरातील संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ही लस तयार करण्याच्या दृष्टीने अनेक वैज्ञानिक गुंतले आहेत. मात्र अद्याप कोणालाही यात यश आलं नाही.
संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त आहे त्यात भारतात त्याच्या औषधाबद्दल एक चांगली बातमी आहे. आयआयटी दिल्लीने ही चांगली बातमी दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्लीसह बायोकेमिकल अभियांत्रिकीचे प्रो. डी. सुंदर यांनी शोधून काढले की, अश्वगंधा नैसर्गिक औषध कोविड -१९ रुग्णांना बरे करू शकते.
अश्वगंधाचा एक रासायनिक पदार्थ कोविड १९ पेशींचा विकास रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. हे कोविड -१९ च्या पेशींना विकसित होण्यापासून रोखणारी प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रा. डी. सुंदर १५ वर्षांपासून अश्वगंधावर जपानच्या संस्थेसोबत कार्यरत आहेत. आमच्या शोधपेपरचा पहिला अहवाल आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल ऑफ बायोमोलिक्युलर डायनामिक्समध्ये प्रकाशित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दोन दिवसांत ते प्रकाशित होणे अपेक्षित आहे. हे संशोधन पुढे घेऊन आम्ही अश्वगंधापासून कोविड -१९ औषध बनवण्याच्या दिशेने कार्य करू असं त्यांनी सांगितले. अश्वगंधापासून कोविड -१९ औषध तयार करण्यासाठी अनेक क्लिनिकल ट्रायल्स करणे आवश्यक आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळेत प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही यावरही काम करू असं प्रा. डी सुंदर म्हणाले.
अश्वगंधा परंपरेने भारतात आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरला जातो. ते म्हणाले की, एका महिन्यापूर्वी केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांना जोडणारी एक टास्क फोर्स तयार केली. यात त्यांना कोविड -१९ च्या संदर्भात अश्वगंधा, यष्टीमध, गुडुची यांच्यासह पिपाळी, आयुष-६४ (मलेरियावरील औषध) यासारख्या आयुर्वेद औषधांवर संशोधन करण्यास सांगितले होते. प्रा.डी.सुंदर म्हणाले की, अश्वगंधा संशोधन आमच्या बाजूने स्वतंत्रपणे केले गेले आहे. इतर अनेक संशोधक कोविड -१९ वरील आमचे संशोधन वापरू शकतात असंही त्यांनी सांगितले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी
कोरोना नसतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का करतायेत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’चं सेवन?
४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा!
आनंदाची बातमी; ‘या’ नैसर्गिक वनस्पतीतून भारत बनवणार कोरोनावर ‘रामबाण’ औषध?