CoronaVirus : आंध्रप्रदेशात कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी उडाली झुंबड, शेजारच्या राज्यातील लोकांनीही केली मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:21 PM2021-05-21T19:21:56+5:302021-05-21T19:26:01+5:30

आनंदैया आपले आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयड्रॉपदेखील दिला जात आहे. मात्र, आयुर्वेदिक औषधाने कोरोना बरा होतो, याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अद्याप नाही. तरीही येथे मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत. (Ayurvedic cure for corona draws large crowds in Andhra pradesh)

CoronaVirus Ayurvedic cure for corona draws large crowds in Nellore Andhra pradesh | CoronaVirus : आंध्रप्रदेशात कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी उडाली झुंबड, शेजारच्या राज्यातील लोकांनीही केली मोठी गर्दी

CoronaVirus : आंध्रप्रदेशात कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी उडाली झुंबड, शेजारच्या राज्यातील लोकांनीही केली मोठी गर्दी

Next

हैदराबाद - कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण उपचार शोधतो आहे. यातच शेकडो लोक कोरोनावरील उपचारासंदर्भात दावा करत आहेत. कुणी गोमूत्राने उपचाराचा दावा करत आहे. तर कुणी जादू-टोन्यावर विश्वास ठेवत आहे. असेच एक अंधविश्वासाचे प्रकरण आंध्र प्रदेशात (Andhra pradesh) समोर आले आहे. (CoronaVirus Ayurvedic cure for corona draws large crowds in Nellore Andhra pradesh)

आंध्र प्रदेशातील नेल्लोर (Nellore ) जिल्ह्यातील एका छोट्या गावात आयुर्वेदिक औषधासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. येथे दूरवरून आलेले लोक कोरोनाच्या उपचारासाठी रोजच्या रोज रांगेत उभे राहतात. खरे तर, येथील आनंदैया नावाच्या एका आयुर्वेदीक डॉक्टरने आपल्या औषधाने कोरोनावरील यशस्वी उपचाराचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यामुळे येथे दूरवरून लोक यायला सुरुवात झाली आहे. एवढेच नाही, तर शेजारील राज्यांतूनही येथे मोठ्या प्रमाणावर लोक यायला सुरुवात झाली आहे. 

जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती

लोकांना मोफत औषध -
आनंदैया आपले आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयड्रॉपदेखील दिला जात आहे. मात्र, आयुर्वेदिक औषधाने कोरोना बरा होतो, याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अद्याप नाही. तरीही येथे मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत.

औषधावर प्रशासनानं घातली बंदी! -
येथे येणाऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे, की 'याचा प्रयोग करणे काही वाईट नाही. रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे, ऑक्सिजन बेडसाठी या रुग्णालयातून, त्या रुग्णालयात पळापळ सुरू आहे. यात अनेत लोक आपला जीव गमावत आहेत. आम्हाला आशा आहे, की औषध उपयोगी ठरेल.' माध्यमात आलेल्या काही वृत्तांनुसार, प्रशासनाने सध्या खबरदारी म्हणून या औषधावर बंदी घातली आहे. आयुष आयुर्वेदचे डॉक्टर या औषधाची तपासणी करत आहेत. परिणाम सकारात्मक आल्यास यावर निर्णय घेतला जाईल.

Corona Vaccine: कोविशिल्ड लस कोव्हॅक्सीन प्रमाणे शक्तीशाली नाही? एका क्लिकवर जाणून घ्या, नेमकं काय आहे तथ्य

Web Title: CoronaVirus Ayurvedic cure for corona draws large crowds in Nellore Andhra pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.