Coronavirus News: मी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 06:08 PM2020-05-25T18:08:29+5:302020-05-25T18:16:56+5:30

विमानतळावरून मोदींच्या मंत्र्यानं थेट क्वारंटिन न होता थेट घर गाठलं

Coronavirus Being a Minister I am Exempted No Hotel Quarantine for Sadananda Gowda kkg | Coronavirus News: मी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार

Coronavirus News: मी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार

Next

बंगळुरू: दिल्लीहून बंगळुरूला पोहोचलेले भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटिन) न राहता थेट घर गाठलं. सदानंद गौडा यांनी नियमानुसार हॉटेलमध्ये राहणं गरजेचं होतं. मात्र विमानतळावरून बाहेर पडताच गौडा थेट त्यांच्या गाडीत बसले. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं ते होम क्वारंटिन राहणार असल्याची माहिती त्यांच्या सचिवानं दिली.

क्वारंटाईनची नियमावली सर्व नागरिकांसाठी लागू आहे. पण त्यात काही जणांसाठी अपवाद करण्यात आल्याचा दावा गौडा यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधताना केला. 'मी मंत्री असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारनं काही अपवाद केले आहेत,' असं गौडा म्हणाले. माझ्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. केंद्राच्या औषध विभागाचा प्रमुख असल्यानं औषधांचा तुटवडा निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं गौडा म्हणाले. मी औषध पुरवठा केला नाही, तर रुग्णांची संख्या दुप्पट होईल, असंदेखील त्यांनी म्हटलं.

सदानंद गौडा यांनी स्वत:ची तुलना अप्रत्यक्षपणे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी केली. 'संपूर्ण देशात औषधांचा पुरवठा कायम राहील हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. डॉक्टर, औषध पुरवठा करणाऱ्या क्वॉरंटिन झाल्यास आपण कोरोनाला कसं पराभूत करणार?,' असा सवाल त्यांनी विचारला.

देशाच्या इतर राज्यांमधून विमानानं येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस इस्टिट्युशनल क्वॉरंटिन आणि त्यानंतर सात दिवस होम क्वॉरंटिन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. यामधून काही जणांना वगळण्यात आलं आहे. मात्र त्यामध्ये मंत्र्यांचा समावेश असल्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. आज देशांतर्गत हवाई वाहतुकीला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्र्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात अनेक मंत्री पॉझिटिव्ह आढळले.
 

Web Title: Coronavirus Being a Minister I am Exempted No Hotel Quarantine for Sadananda Gowda kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.