VIDEO: घरी सोडण्याची मागणी करणाऱ्या मजुरांना पोलीस अधिकाऱ्याची लाथेनं मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:26 PM2020-05-12T13:26:24+5:302020-05-12T13:28:24+5:30
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; मजुरांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित
बंगळुरू: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बऱ्याच दिवसांपासून ठप्प होती. आता काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू झाल्यानं देशभरात अडकलेले मजूर त्यांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. हाती काम नसल्यानं लाखो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी मजूर हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. अशाच काही मजुरांची गर्दी बंगळुरुत झाली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं काही मजुरांना लाथेनं मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
घरी सोडण्याची मागणी करत काही मजूर बंगळुरूतल्या के. जी. हल्ली पोलीस ठाण्याजवळ जमले होते. आम्हाला उत्तर प्रदेशला सोडण्याची व्यवस्था करा. व्यवस्था होईपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा मजुरांनी घेतली. या मजुरांना उपनिरीक्षक राजा साहेब यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मजूर त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे राजा साहेब संतापले. त्यांनी काही मजुरांच्या कानशिलात लगावली, तर काहींना लाथेनं मारहाण केली.
Bengaluru cop kicks migrants for demanding home and traveling@BlrCityPolice@BSYBJP@BJP4Karnataka@CMofKarnataka@DKShivakumar@srinivasiyc@srivatsayb
— Azmath sultan 🇮🇳INC (@sultan_azmath) May 12, 2020
This officer should be suspended from the job. #CoronavirusLockdownpic.twitter.com/KZInFhOnwf
राजा साहेब यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राजा साहेब यांना निलंबित करण्यात आलं. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी खाते अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी एस. डी. शरणप्पा यांनी दिली.
तर दुसरीकडे बंगळुरूपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मालूर नागरी रुग्णालयातल्या एका डॉक्टरनं कोरोना चाचणीचे अहवाल देण्यासाठी मजुरांकडे लाच मागितली. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशाच्या विविध भागांत अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासीयांशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार?
देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?
आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप