Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:41 AM2020-04-11T08:41:03+5:302020-04-11T08:49:25+5:30
Coronavirus : राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या भीलवाडामधील एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
भीलवाडा - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोनाग्रस्तांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक आहे. तर एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
राजस्थानमधील भीलवाडा मॉडेल सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या भीलवाडामधील एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. भीलवाडा येथील एक दाम्पत्य दिवसभर घराबाहेर राहून देशसेवा करत आहेत. कोरोना वॉरियर्स असलेल्या या दाम्पत्याला एक सात वर्षांची मुलगी आहे. मात्र कामानिमित्त सतत बाहेर राहावं लागत असल्याने हे आपल्या लेकीला घरामध्ये कुलूप लावून बंद करून ठेवतात. विशेष म्हणजे पती वैद्यकीय विभागात काम करतात तर पत्नी पोलीस आहेत. मात्र देशसेवा करताना मुलीला घरात एकटं ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.
Coronavirus : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयhttps://t.co/p1HJw7E0yu#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 10, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाड्याचे रहिवासी असलेले दिलखूश हे जिल्हा मुख्यालयातील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात कंपाऊडर आहेत. तर दिलखूश यांची पत्नी सरोज राजस्थानपोलिसात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. भीलवाड्यात कोरोनामुळे 20 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. यापुढे 13 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. हे दोन्ही दाम्पत्य अशा ठिकाणी काम करतं की त्यांनी कामासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. या दाम्पत्याला सात वर्षांची मुलगी असून दिक्षिता असं तिचं नाव आहे. ही चिमुकली गेल्या 10 दिवसांपासून आई-बाबा कामावर असल्याने घरात एकटी राहते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लॉकडाऊनमुळे चिमुकलीला सांभाळायला कुटुंबातील कोणतीच व्यक्ती येऊ शकत नाही. त्यामुळे या दाम्पत्याने आपल्या मुलीला कुलूप लावून घरात बंद करून ठेवलं आहे. दिलखूश रुग्णालयात सलग 10 दिवस ड्यूटीवर होते. ते घरात आले तरी मुलीला भेटू शकत नाही. कारण सलग 10 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर त्यांना पुढील 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागते. तर दिक्षिताची आई सरोजदेखील कर्फ्यूदरम्यान शहरात आपल्या टीमसोबत फिरत असताना लोकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन देत असते. कामावरून त्या 8-9 तासांनी घरी येते. अशा परिस्थिती त्यांची लेक दिवसभर घरात एकटी असते.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus लॉकडाउन संपणार की वाढणार? आज ठरणार
CoronaVirus कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुुरुवात?