भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:10 PM2020-05-06T16:10:24+5:302020-05-06T16:38:26+5:30

कोरोना विषाणूविरोधात लस विकसित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या संशोधनाची प्रगती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. यावेळी कोरोनाविरोधातील लसीवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

coronavirus: Big news for India ... 30 corona vaccines tested at different stages; Scientists inform Narendra Modi BKP | भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती

भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती

Next
ठळक मुद्देदेशात कोरोनावरील ३० विविध लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात असल्याचे शास्रज्ञांनी पंतप्रधानांना सांगितलेकाही लसी प्रायोगासाठी वापरण्याच्या टप्प्यावर आल्या आहेतयाबाबत पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून बैठक संपल्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे

नवी दिल्ली - लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी विकसित होत असलेल्या लसीकडेच आशेने पाहिले जात आहे. दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईत भारतासाठी मोठी बातमी आली आहे. कोरोना विषाणूविरोधात लस विकसित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या संशोधनाची प्रगती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. यावेळी कोरोनाविरोधातील लसीवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

देशात कोरोनावरील ३० विविध लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात असल्याचे शास्रज्ञांनी पंतप्रधानांना सांगितले. तसेच काही लसी प्रायोगासाठी वापरण्याच्या टप्प्यावर आल्या असल्याची माहितीही या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली.

याबाबत पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून बैठक संपल्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनाविरोधात लस विकसित करण्यासाठीच्या प्राथमिक टप्प्यात भारतीय कंपन्या काम करत आहेत.

भारतामध्ये कोरोनावर लस विकसित करण्यासाठी तीन वेगवेगळे दृष्टीकोन समोर ठेवून काम केले जात आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

त्यातील पहिली बाब म्हणजे सध्या वापरात असलेल्या औषधांमधून कोरोनावर प्रभावी ठरू शकेल, अशा औषधावर अभ्यास केला जात आहे. सद्यस्थितीत अशा चार औषधांचे याबाबत संशोधन आणि परिक्षण केले जात आहे. यातील दुसऱ्या प्रकारात एक नवे औषध आणि मॉलिक्युल्स विकसित करण्यार भर देण्यात येत आहे. तर तिसऱ्या प्रकारामध्ये विषाणूविरोधी गुण तपासण्यासाठी काही अर्क आणि उत्पादनांची तपासणी केली जात आहे.

Web Title: coronavirus: Big news for India ... 30 corona vaccines tested at different stages; Scientists inform Narendra Modi BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.