Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 01:23 PM2020-04-07T13:23:54+5:302020-04-07T13:35:48+5:30
Coronavirus : अनेक वर्षांपासून बेपत्ता झालेला मुलगा कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबियांना पुन्हा मिळाला आहे.
छपरा - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशात गेल्या 24 तासांत 354 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4421 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 114 वर पोहोचला आहे. देशातील 4421 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 325 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याच दरम्यान विविध घटना समोर येत आहेत. कोरोनाचा कहर सुरू असताना एका कुटुंबाला कोरोनाचा फायदा झाला आहे. तब्बल 7 वर्षांनी बेपत्ता असलेला मुलगा सापडला आहे.
बिहारच्या छपरामधील मित्रसेन गावात ही घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून बेपत्ता झालेला मुलगा कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबियांना पुन्हा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील बाबुलाल दास यांचा मुलगा अजय कुमार उर्फ विवेक दास हा सात वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला. पण तो काही सापडला नाही. दोन-तीन वर्षांनंतरही तो घरी परत आला नाही. मग तो जिवंत नाही असं समजून घरच्यांनी त्याचा विचार करायचा सोडून दिला. त्यांनी त्याचा शोध घेणंही बंद केलं. मात्र त्याच्या आई-वडिलांना एक दिवस आपला मुलगा नक्की घरी परत येईल अशी आशा होती.
#CoronaVirus : अमेरिकेत कोरोनाचा कहर, २४ तासांत ११५० जणांचा मृत्यूhttps://t.co/orcVO6OPPi
— Lokmat (@MiLOKMAT) April 7, 2020
उत्तर प्रदेश पोलीस सोमवारी ( 6 एप्रिल) एका तरुणाला घेऊन भेल्दी पोलीस ठाण्यात दाखल झाले. अजय कुमार उर्फ विवेक दास असे नाव सांगून त्याच्याबाबत विचारणा करू लागले. पोलीस अजयला घेऊन त्याच्या मित्रसेन गावी पोहोचले. घरातून बेपत्ता झाल्यानंतर अजय भरकटत उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे पोहोचला. तिथे एका गुन्ह्यात त्याला तुरुंगवास झाला आणि तो शिक्षा भोगत होता. सध्या कोरोनामुळे काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात अजय कुमारचं नाव आहे अशी माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना दिली. मुलगा घरी आल्याने त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला आहे.
#IndiaFightsCorona भारताचा मदतीचा हात: ‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार. pic.twitter.com/Urkt5zornp
— Lokmat (@MiLOKMAT) April 7, 2020
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 868 वर पोहचली आहे. तसेच मागील 24 तासांत मुंबई शहर उपनगरात 57 नव्या कोरोना (कोविड-19) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या 490 वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे. राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण
'फिर मुस्कुराएगा इंडिया...फिर जीत जाएगा इंडिया', नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ