Coronavirus : हृदयद्रावक! ...अन् चिमुकल्याने आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 04:30 PM2020-04-11T16:30:25+5:302020-04-11T16:32:22+5:30

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Coronavirus bihar son dies in mothers lap in lockdown SSS | Coronavirus : हृदयद्रावक! ...अन् चिमुकल्याने आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

Coronavirus : हृदयद्रावक! ...अन् चिमुकल्याने आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

जहानाबाद - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये एका चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीतच प्राण सोडला आहे.
 
बिहारच्या शाहपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकला आजारी होता मात्र लॉकडाऊनमध्ये उपचारासाठी रुग्णवाहिका नसल्याने अखेर त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्था भागातील शाहपूरचे गावचा रहिवासी असलेल्या गिरिजेश कुमार यांचा तीन वर्षांचा चिमुकला गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. 

चिमुकल्याची तब्येत आणखी बिघडल्याने गिरिजेश यांनी मुलाला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाच नव्हती. रुग्णालयाला विनंती करून ही त्यांनी रुग्णवाहिका दिली नाही. वेळीच उपचार न मिळल्याने अखेर चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीमध्येच शेवटचा श्वास घेतला. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीय आणि स्थानिकांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. महिलेला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णालयातील आयसीयुला कुलूप असल्याने जवळपास अर्धा तास महिला रुग्णवाहिकेतच होती. पुढचे उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई असं 55 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचं नाव होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच त्यांचा रक्तदाब वाढल्यानै कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र कोरोनाच्या संशयामुळे लक्ष्मीबाई यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं. उपचारासाठी दाखल होताच रुग्णालयातील आयसीयुला कुलूप असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतच अर्धा तास थांबावे लागले. आयसीयूचं कुलूप काही वेळाने उघडण्यात आलं मात्र उपचार सुरू होईपर्यंत लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'देशभरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा', केजरीवालांचा पंतप्रधानांना सल्ला

Coronavirus : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत तब्बल 2108 जणांचा मृत्यू

Coronavirus : जनधनचे पैसे आणायला गेलेल्या महिलांच्या हातातलं धनही गेलं; 10 हजाराच्या दंडानं गणित बिघडलं

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'

Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वर

Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा 

 

Web Title: Coronavirus bihar son dies in mothers lap in lockdown SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.