CoronaVirus News: भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला 'ती' पार्टी महागात; फोटो व्हायरल झाले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 09:51 AM2020-05-14T09:51:04+5:302020-05-14T09:53:46+5:30
CoronaVirus News: घरात केलेल्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
बडोदा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असताना सगळे नियम धाब्यावर बसवून वाढदिवसाची पार्टी करणं भाजपा नेत्याला महागात पडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजपा नेत्यासह आणखी सात जणांना अटक केली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. अटक करण्यात आलेले सात जण प्रभाग अध्यक्ष अनिल परमार यांच्या घरात पार्टीसाठी जमले होते. परमार तुलसीवाड भागात वास्तव्यास आहेत.
अनिल परमार यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. परमार यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आसपास राहणारी मंडळी उपस्थित होती. परमार यांना भरवत असतानाचे फोटो सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाल्याचं दिसत होतं. 'त्यांनी वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामधून आठ जणांची ओळख पटली. अजून काही जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नियमांनुसार सगळ्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे,' अशी माहिती करेलीबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. ए. जाडेजा यांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणी प्रभाग क्रमांक सातचे भाजपा अध्यक्ष अनिल परमार यांच्यासह मनिष परमार, नकुल परमार, मेहुल सोळंकी, चंद्रकांत भ्रहंब्रे, राकेश परमार आणि धवल परमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २६९, २७० आणि १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी
...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी
नीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादर
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर