coronavirus: भाजपा आमदाराने केली कोविड केअर सेंटरमध्ये घुसखोरी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 13:45 IST2020-08-04T13:30:32+5:302020-08-04T13:45:02+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. दरम्यान, असाच एक प्रकार समोर आला आहे.

coronavirus: भाजपा आमदाराने केली कोविड केअर सेंटरमध्ये घुसखोरी, गुन्हा दाखल
आगरताळा - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीतही कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. दरम्यान, असाच एक प्रकार त्रिपुरामध्ये समोर आला आहे. त्रिपुरामधीलभाजपा आमदार आणि माजी आरोग्यमंत्री सुदीप रॉय बर्मन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदीप रॉय बर्मन हे रविवारी संध्याकाळी कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करून कोविड केअर सेंटरमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी पीपीई किट परिधान केले होते. मात्र नियमांनुसार त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास परवानगी नव्हती.
सुदीप रॉय यांचा मतदारसंघ असलेल्या आगताळामधील एका कोविड केआर सेंटरमधील एका रुग्णाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. तसेच या रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार सुदीप रॉय स्वतः पीपीई किट परिधान करून कोविड केअर सेंटरची पाहाणी करण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पश्चिम त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस संस्थात्मक क्वारेंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे आदेश पक्षपातीपणा करणारे असल्याचे सांगत संबंधित आमदारांनी क्वारेंटाईनमध्ये जाण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी सोशल मीडिया आणि मीडियावर कसा काय पोहोचला, असा सवाल सुदीप रॉय यांनी विचारला आहे.
दरम्यान, संबंधित कोविड केअर सेंटरमध्ये असलेली राहण्याची व्यवस्था पाहून मी विचलित झालो आहे. यासाठी कठोर मॉनिटरिंगची गरज आहे, असेही सुदीप रॉय बर्मन यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल