CoronaVirus चाचणी निगेटिव्ह येऊनही सुरेश प्रभूंनी स्वत:ला केले विलग, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 09:35 AM2020-03-18T09:35:19+5:302020-03-18T09:37:51+5:30

सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आधी शिवसेना खासदार आणि नंतर भाजपाकडून राज्यसभा खासदार राहिलेले माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे १४ दिवसांसाठी सेल्फ क्वारन्टाईन झाले आहेत.

CoronaVirus BJP MP Suresh Prabhu has self isolation at his residence 14 days hrb | CoronaVirus चाचणी निगेटिव्ह येऊनही सुरेश प्रभूंनी स्वत:ला केले विलग, कारण...

CoronaVirus चाचणी निगेटिव्ह येऊनही सुरेश प्रभूंनी स्वत:ला केले विलग, कारण...

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या एका केंद्रीय राज्य मंत्र्याने कालच स्वत:ला कोरोनामुळे विलग केल्याचे समोर आले असताना आणखी एक खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही स्वत:ला विलग केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आधी शिवसेना खासदार आणि नंतर भाजपाकडून राज्यसभा खासदार राहिलेले माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे १४ दिवसांसाठी सेल्फ क्वारन्टाईन झाले आहेत. सुरेश प्रभू हे सेकंड शेर्पा बैठकीसाठी सौदी अरेबियाला गेले होते. ही बैठक १० मार्चला झाली होती. मात्र, आखाती देशांमधून भारतात कोरोनाने शिरकाव केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रभू यांनी विलग होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाची टेस्ट सुरुवातीला निगेटिव्ह आली तरीही नंतर कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. कामोठेमधील महिलेला विमानतळावर कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, नंतर १३ दिवसांनी तिला खोकला, ताप आल्याने पुन्हा चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. अशाचप्रकारे देशभरातही रुग्ण सापडल्याने प्रभूंनी हा निर्णय घेतला आहे.

सुरेश प्रभू पुढील १४ दिवस घरीच निरिक्षणाखाली राहणार आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे 14 मार्चला त्रिवेंद्रममधील मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये बैठकीसाठी गेले होते. यावेळी या बैठकीला स्पेनहून परतलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे. मुरलीधरण हे सध्या केरळमधील त्रिवेंद्रममध्ये असून तेथेच त्यांनी विलगीकरण केले आहे. 

राष्ट्रहिताला प्राधान्य देऊया

मी सौदी अरेबियामधील खोबर येथे जी -२० च्या या महत्वाच्या शेर्पा बैठकीस सामील होण्यासाठी जाताना तसेच तिथे गेल्यावर व पुन्हा भारतात परतल्यावर कोरोना व्हायरस ची तपसणी करण्यात आली असल्याचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी सांगितले.                                    यावेळी मी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासणीला सहकार्य केले आहे. तसेच सर्व वैद्यकीय अहवाल निगेटीव आले आहेत. सर्वानी प्रवासादरम्यान चेकअप करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य करुन आपली व इतरांची सुरक्षितता पाळा राष्ट्रहिताला प्राधान्य देऊया असे आवाहन ही खासदार प्रभू यांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus BJP MP Suresh Prabhu has self isolation at his residence 14 days hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.