भाजपा खासदारांकडूनच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर, दिल्लीतून कारने गाठले राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 07:23 PM2020-04-15T19:23:50+5:302020-04-15T19:30:04+5:30

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासल्याची बातमी समोर आली आहे. 

coronavirus: BJP MPs break lockdown, gose by car from Delhi to jharkhand BKP | भाजपा खासदारांकडूनच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर, दिल्लीतून कारने गाठले राज्य

भाजपा खासदारांकडूनच लॉकडाऊनचे नियम धाब्यावर, दिल्लीतून कारने गाठले राज्य

Next
ठळक मुद्देजनतेने लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळावेत, असे आवाहन मोदींनी केले आहेमोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासलालॉकडाऊन सुरू असताना भाजपाचे दोन खासदार दिल्लीतून कारने प्रवास करत झारखंडमध्ये पोहोचले

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यासाठी मोदींनी देशातील लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच जनतेने लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळावेत, असे आवाहनही मोदींनी केले आहे. मात्र मोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासल्याची बातमी समोर आली आहे. 

देशात लॉकडाऊन सुरू असताना भाजपाचे दोन खासदार दिल्लीतून कारने प्रवास करत झारखंडमध्ये पोहोचल्याचे उघड झाले आहे. भाजपाचे धनबाद येथील खासदार पी. एन. सिंह आणि रांचीमधील खासदार संजय सेठ हे दिल्लीतून कारने निघून रस्त्याने निघून झारखंडला पोहोचल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पी. एन सिंह घरी पोहोचल्यानंतर क्वारेंटिन झाले. मात्र संजय सेठ क्वारेंटिन झाले नाहीत. मंगळवारी ते रांचीचे उपायुक्त महिमापत रे यांची भेट घेण्यासही गेले होते

एकीकडे लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे नेतेमंडळीच नियमांचे उल्लंघन करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: coronavirus: BJP MPs break lockdown, gose by car from Delhi to jharkhand BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.