Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 09:14 AM2020-05-07T09:14:57+5:302020-05-07T09:26:55+5:30
बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करत आहे, मग तो देशात असो की परदेशात, या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही.
नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेक देशांत संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशीच आज कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला जात असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून एक आभासी कार्यक्रम आयोजित केला असून, त्याला बड्या नेत्यांची उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला आहे. भगवान बुद्धांनी भारतीय परंपरा समृद्ध केली, ते स्वतःच आयुष्याचे दीप झाले आणि इतरांचं जीवनही प्रकाशमान केलं. भगवान बुद्धांचा संदेश आपल्या आयुष्यात निरंतर आहे, बुद्ध हे फक्त नाव नाही, तर प्रत्येक मानवाच्या हृदयात धडकणारा विचार आहे. भगवान बुद्ध यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. त्याग, समर्पणाची भावना म्हणजे, गौतम बुद्ध असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.
यावेळी परिस्थिती वेगळी आहे, जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणं माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असतं, परंतु सद्य परिस्थिती त्यास परवानगी देत नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करत आहे, मग तो देशात असो की परदेशात, या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. कोणताही स्वार्थ न बाळगता आपल्याला आपल्या कुटुंबाचे तसेच परिसराचे संरक्षण करावे लागेल. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. सामाजिक कार्य निरंतर सेवेने केले पाहिजे, इतरांवर करुणा असणे महत्त्वाचे असते, असंही मोदी म्हणाले आहेत.
Today, India is standing firmly in support of everyone, without any discrimination, who are in need or who are in trouble, in the country or across the globe: PM Narendra Modi. #COVID19pic.twitter.com/KRB3c00JSA
— ANI (@ANI) May 7, 2020
समाज बदलला, परंतु बुद्धांचा संदेश नाही!
बुद्ध हे कोणत्याही एका परिस्थितीसाठी मर्यादित नाहीत, ते मानवतेच्या अंतर्गत प्रत्येकाला मदत करण्याचा संदेश देतात. आज समाज व्यवस्था बदलली आहे, परंतु भगवान बुद्धाचा संदेश तोच आहे आणि आपल्या जीवनात याला एक विशेष स्थान आहे. आज देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोक आपापल्या परीनं सेवा करीत आहे. आजारी लोकांवर उपचार करण्यापासून रस्त्यांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक जण आपल्यासाठी सेवा देत आहे. आज जग अशांत आहे, अशा वेळी बुद्धांची शिकवण महत्त्वाची आहे.
During this difficult time of #CoronavirusLockdown, there are several ppl around us who are working 24 hours to help others, to maintain law&order, to cure infected persons&to maintain cleanliness, by sacrificing their own comforts. All such people deserve appreciation&honour: PM pic.twitter.com/hRaeBVVKVV
— ANI (@ANI) May 7, 2020
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या कोरोना वॉरियर्सचा सन्मान करण्यात आला आहे. जगभरातील अनेक बौद्ध नेते या कार्यक्रमास उपस्थित आहेत, ते कोरोना विषाणूविरुद्धच्या या युद्धामध्ये आपले मत मांडतील. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी खबरदारी घेतली जात आहे. या वेळी बुद्ध पौर्णिमा सोहळा सामाजिक अंतर लक्षात घेऊन आभासी पातळीवर साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम कोरोना पीडित आणि मेडिकल स्टाफ, डॉक्टर, पोलीस आणि इतरांसारख्या फ्रंटलाइन वॉरियर्सच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला आहे.
The message and resolve to reduce problems of every life has guided the culture of India. Lord Buddha contributed to the enrichment of Indian civilization and tradition. Buddha became his own light and also lit the lives of others in his journey of life: PM Narendra Modi pic.twitter.com/V9aQiPosHs
— ANI (@ANI) May 7, 2020
I extend my wishes to all on the occasion of Buddha Purnima. Today, situation is such that I can't participate in Buddha Purnima programs physically. It would have been my pleasure to be with you all in the celebrations,but circumstances prevailing today do not permit us: PM Modi pic.twitter.com/5pfrMH7eOU
— ANI (@ANI) May 7, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या
CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता