'आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागेल', दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 05:39 PM2022-04-19T17:39:11+5:302022-04-19T17:40:05+5:30
Coronavirus Cases In Delhi : सोमवारी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 501 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. पॉझिटिव्हिटी रेट 7.72 पर्यंत वाढला.
नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचे एक विधान समोर आले आहे. मनीष सिसोदिया म्हणाले की, 'आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे.'
आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागेल, कारण ते काही प्रमाणात राहील. त्यात आणखी वाढ झाल्यास आम्ही कठोर कारवाई करू. तूर्तास घाबरण्याची गरज नाही. प्रकरणे वाढत आहेत, म्हणून आम्ही 20 एप्रिल रोजी एक्सपर्ट्स आणि डीडीएमए (DDMA) सोबत बैठक घेणार आहोत, असे मनीष सिसोदिया म्हणाले.
We have to learn to live with #COVID19 as it will stay in some capacity; we will take strict action if it increases more. For now, there's no need to panic. The counts are incoming, so we have a meeting with experts & DDMA on April 20: Delhi Deputy CM Manish Sisodia pic.twitter.com/rXXhhaDeh0
— ANI (@ANI) April 19, 2022
दिल्लीत किती आहे पॉझिटिव्हिटी रेट?
सोमवारी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 501 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. पॉझिटिव्हिटी रेट 7.72 पर्यंत वाढला. मात्र, या काळात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
काय म्हणाले दिल्लीचे आरोग्यमंत्री?
तत्पूर्वी, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सोमवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, परंतु रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याने ही चिंताजनक परिस्थिती नाही. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. चेहऱ्यावर मास्क घालणे आवश्यक आहे. बुधवारी डीडीएमएची एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये मास्क न घातल्याबद्दल दंड आकारण्याचा विचार करणे अपेक्षित आहे.
याचबरोबर, दिल्लीत संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, परंतु आम्ही 100 टक्के लसीकरण केले आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना आधीच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याशिवाय, बाधित रुग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ही चिंताजनक स्थिती नाही. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.