Coronavirus Cases: कोरोना सुपरफास्ट! देशात गेल्या 24 तासांत 59,118 नवे रुग्ण; 257 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:54 AM2021-03-26T09:54:53+5:302021-03-26T09:57:26+5:30

Coronavirus live news : केंद्रीय आरोग्य़ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडू लागले आहेत. यानंतर दिल्ली पंजाबमध्ये सापडत आहेत.

Coronavirus Cases: India reports 59,118 new COVID19 cases, 32,987 recoveries, and 257 deaths | Coronavirus Cases: कोरोना सुपरफास्ट! देशात गेल्या 24 तासांत 59,118 नवे रुग्ण; 257 जणांचा मृत्यू

Coronavirus Cases: कोरोना सुपरफास्ट! देशात गेल्या 24 तासांत 59,118 नवे रुग्ण; 257 जणांचा मृत्यू

Next

देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona virus second wave) वेगाने पसरू लागली असून गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांचा आकडा 59,118 वर गेला आहे, तर 32,987 रुग्ण बरे झाले आहेत. मृतांचा आकडाही वाढला असून गेल्या 24 तासांत 257 जणांचा मृत्यू झाला आहे. (India reports 59,118 new COVID19 cases, 32,987 recoveries, and 257 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry)


केंद्रीय आरोग्य़ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडू लागले आहेत. यानंतर दिल्लीपंजाबमध्ये सापडत आहेत. महाराष्ट्रात १ लाख कोरोना रुग्णांचा आकडा अवघ्या चार दिवसांत गाठला आहे. पंजाबमध्ये कोरोनाचे 2700 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर दिल्लीमध्ये 1500 नवे रुग्ण सापडले आहेत. 


मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत  5,504 नवे कोरोनाबाधित, तर पुण्यात  6,432 कोरोनाबाधित सापडले आहेत. महाराष्ट्रात 35,952 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. 20,444 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 111 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 21 मार्चला 30,535, 22 मार्चला 24,645, 23 मार्चला 28,699, 24 मार्चला 31,855 आणि 25 मार्चला 35,952 नवे रुग्ण सापडले आहेत. 




देशात एकूण रुग्णांची संख्या 1,18,46,652 झाली असून 1,12,64,637 बरे झाले आहेत. सध्या देशात 4,21,066 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मृतांचा एकूण आकडा हा 1,60,949 वर (Coronavirus death toll) पोहोचला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर देशात 5,55,04,440 लसीकरण झाले आहे. 

Web Title: Coronavirus Cases: India reports 59,118 new COVID19 cases, 32,987 recoveries, and 257 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.