CoronaVirus News: सावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:58 PM2020-06-12T16:58:27+5:302020-06-12T17:01:08+5:30

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळ; जगात चौथ्या क्रमांकावर

coronavirus cases may reach on their peak in july or august in india says dr s p byotra | CoronaVirus News: सावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा

CoronaVirus News: सावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी कोरोनाचे ९ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र आज पहिल्यांदा कोरोनाचे जवळपास ११ हजार रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत ब्रिटनला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर पोहोचला. येत्या काही दिवसांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहील, असा धोक्याचा इशारा सर गंगा राम रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. ब्योत्रा यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर थांबणार नाही. जुलैच्या सुरुवातीला किंवा मध्यावर अथवा ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल, असा अंदाज ब्योत्रा यांनी वर्तवला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे. मात्र कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या तिमाहीपर्यंत तरी येणार नाही, अशी शक्यता ब्योत्रा यांनी वर्तवली. याआधी दिल्ली सरकारनंदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यात दिल्ली सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संकटाबद्दलची आकडेवारी ठेवण्यात आली. १५ जूनपर्यंत दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजारांपर्यंत जाईल. सध्या हा आकडा ३५ हजारांच्या जवळपास आहे. ३० जूनपर्यंत दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या १ लाख, १५ जुलैपर्यंत २.२५ लाख आणि ३१ जुलैपर्यंत ५.३२ लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. यापैकी १ लाख ४७ हजार १९५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर साडे हजार जणांनी जीव गमावला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा लाखाच्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. 

भारतीयांना धक्का?; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता; ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लॉकडाऊनच्या काळातील पूर्ण पगार मिळणार का?; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर

Web Title: coronavirus cases may reach on their peak in july or august in india says dr s p byotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.