Coronavirus: कोरोनाला 'चिनी व्हायरस' म्हणण्यावर भारताला आक्षेप; चीननं मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 10:14 AM2020-03-26T10:14:57+5:302020-03-26T10:15:51+5:30

भारतानं अमेरिकेनं आमच्यावर लावलेल्या आरोपांचं खंडन करून आम्हाला साथ द्यावी, अशी इच्छाही चीनच्या वांग यांनी व्यक्त केली आहे. 

Coronavirus: caught in us and china diplomatic spat on labelling coronavirus india chooses silence vrd | Coronavirus: कोरोनाला 'चिनी व्हायरस' म्हणण्यावर भारताला आक्षेप; चीननं मानले आभार

Coronavirus: कोरोनाला 'चिनी व्हायरस' म्हणण्यावर भारताला आक्षेप; चीननं मानले आभार

Next

नवी दिल्लीः जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संक्रमणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार चीनवर हल्लाबोल करत आहेत. चीननं कोरोना व्हायरस संबंधीची माहिती लपवण्याचा अमेरिकेनं आरोप केला आहे. चीनचे स्टेट काउंसिलर वांग यी यांनी बुधवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या कठीण प्रसंगात तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात याबद्दल तुमचा आभारी असल्याचंही चीननं नमूद केलं आहे. भारतानं अमेरिकेनं आमच्यावर लावलेल्या आरोपांचं खंडन करून आम्हाला साथ द्यावी, अशी इच्छाही चीनच्या वांग यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोना व्हायरसनं पूर्ण जगाला विळख्यात घेतलं आहे. अमेरिका याला चिनी व्हायरस आणि वुहान व्हायरस संबोधून यासाठी चीनला जबाबदार धरत आहे. चीननं या प्रकरणात भारताकडे मदत मागितली होती आणि अमेरिकेच्या या आरोपांचं खंडन करण्यास सांगितलं होतं. अमेरिका हा संकुचित विचारसरणीचा असल्याचं चीनचं म्हणणं आहे. भारतानं अशा परिस्थितीत या आरोप-प्रत्यारोपांहून दूर राहणंच पसंत केलं आहे. 

भारत कोणाचीही बाजू घेणार नाही
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारताने 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. कोरोनाचे जागतिक साथीचा रोग असल्याचा हवाला देत जयशंकर म्हणाले, आम्ही याक्षणी चीनला अनुकूल किंवा विरोध करण्याच्या विचारात नाही. कोरोना विषाणूला अमुक एका देशाच्या नावानं संबोधण्यास आम्ही सहमत नाही. तसेच यावर भारताला काहीही बोलायचे नाही.

अमेरिका सतत करतेय चीनवर आरोप
दुसरीकडे, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माइक पोम्पिओंनी स्पष्टपणे म्हटले आहे की, चीनच्या वुहान शहरात व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला, यात काही शंका नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षानेच संक्रमण वुहानमधून झाल्याचं कबूल केले आहे. परंतु त्याने संबंधित तथ्ये लपवून संपूर्ण जगाला धोक्यात टाकले. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याला ‘चिनी व्हायरस’ म्हटले आहे. तथापि, अमेरिकेत आशियाई लोकांवर वांशिक हल्ले झाल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले की, हा विषाणू चीनपासून पसरत असल्यामुळे त्याला चिनी विषाणू असे म्हटले जात आहे. पोम्पिओंनी केवळ चीनच नव्हे तर इराण आणि रशिया सरकारवरही हल्ला केला. अशा वातावरणात अमेरिकेला थोडे शहाणपण यावे, असं प्रत्युत्तरही रशियानं दिलं आहे. 

चीनने भारताचे मानले आभार
चीनने बुधवारी म्हटले की, त्याने कोरोना विषाणू तयार केला नाही किंवा तो मुद्दाम पसरवला नाही आणि 'चिनी व्हायरस' किंवा 'वुहान व्हायरस' असे म्हणणे चुकीचे आहे. चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग म्हणाले की, आंतरराष्ट्रीय जनतेने चिनी लोकांकडे अन्यायपूर्वक पाहण्यापेक्षा साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, यावर चीनच्या सरकारने भर दिला पाहिजे. या आजाराचा सामना करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सहकार्याबद्दल ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संवाद कायम आहे आणि कठीण काळात त्यांनी साथीला सामोरे जाण्यास एकमेकांना मदत केली आहे. भारताने चीनला वैद्यकीय पुरवठा केला आणि विविध मार्गांनी सहकार्य केले.
 'आम्ही त्यांचे कौतुक करतो आणि धन्यवाद देतो, असंही ते म्हणाले आहेत. चीन आणि वुहानला व्हायरसशी जोडणे चुकीचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनंही जाहीर केलं आहे. जे लोक चीनच्या प्रयत्नांना कमी लेखत आहेत ते आरोग्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी चिनी लोकांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावाची पहिली घटना चीनच्या वुहान शहरात घडली आहे, परंतु चीन हा विषाणूचा स्रोत असल्याचे पुरावे नाही, ज्यामुळे साथीचा रोग पसरला.
 

Web Title: Coronavirus: caught in us and china diplomatic spat on labelling coronavirus india chooses silence vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.