coronavirus: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 15:05 IST2020-06-25T14:36:17+5:302020-06-25T15:05:52+5:30
१ ते १५ जुलैदरम्यान नियोजित असलेल्या सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

coronavirus: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या आणि आता १ ते १५ जुलैदरम्यान नियोजित असलेल्या सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहना यांनी ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. देशातील कोनाच्या संसर्गाचे प्रमाण अद्याप कमी झालेले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
CBSE decides to cancel 10th and 12th exams scheduled for July 1 to 15, Solicitor General Tushar Mehta informs Supreme Court. #COVID19pic.twitter.com/5XjLQWtJpV
— ANI (@ANI) June 25, 2020
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून आज सर्वोच्च न्यालायलात सुनावणी सुरू होती. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, महाराष्ट्र, दिल्ली आणि ओदिशा या राज्यांनी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेण्याबाबत शपथपत्राच्या माध्यमातून असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या १ ते १५ जुलैदरम्यान घेण्या येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल.
Solicitor General (SG) Tushar Mehta says, as soon as conditions will be conducive, we could conduct the CBSE class 12 examinations for students who opt for it. https://t.co/N254IhgKWr
— ANI (@ANI) June 25, 2020
सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यास आयसीएसईने असहमती दर्शवली आहे, अशी माहिती तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली.
ICSE board also to cancel class 10 and 12 board exams. However, ICSE doesn't agree to give option to students to write exam later, Solicitor General Tushar Mehta informs Supreme Court. #COVID19pic.twitter.com/jKTKWbSkj7
— ANI (@ANI) June 25, 2020