Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 09:20 AM2020-04-16T09:20:43+5:302020-04-16T09:24:11+5:30

Coronavirus : संरक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण ही मंत्रालये, भारतीय अन्न महामंडळासारख्या सरकारी संस्था व सर्व केंद्रीय निमलष्करी दले पूर्ण क्षमतेने काम सुरू करतील.

Coronavirus Central and state government offices will start from Monday SSS | Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

Next

नवी दिल्ली - कोरोनाचे मृत्यू व संसर्गाचा प्रसार विचारात घेऊन ‘हॉटस्पॉट’ किंवा ‘कन्टेनमेंट एरिया’ म्हणून जाहीर न केलेल्या देशातील सर्व भागांतील केंद्र व राज्य सरकार तसेच नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदांची कार्यालये येत्या सोमवारपासून (२० एप्रिल) पुन्हा सुरू करण्याची मुभा केंद्राने बुधवारी दिली.

या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटेशन, निर्जंतुकीकरणाच्या सर्व बंधनांचे काटेकार पालन करणे बंधनकारक असेल. नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), सीमाशुल्क विभाग (कस्टम्स) व आपत्ती व्यवस्थापन व पूर्वसूचना देण्याचे काम करणाऱ्या अन्य संस्थाही सोमवारपासून पूर्ण क्षमतेने काम सुरू करू शकतील. राज्यांत पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, कारागृहे, नगरपालिका, महापालिका व नागरी संरक्षण दलांनाही पूर्ण क्षमतेने काम सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

अधिकारी १०० टक्के, तर ३३ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

दिलेल्या निर्देशानुसार केंद्राची सर्व मंत्रालये, विभाग व त्यांची अधिनस्थ कार्यालये उपसचिवापासून वरच्या अधिकाऱ्यांच्या १०० टक्के व इतर कर्मचाऱ्यांच्या  ३३ टक्के उपस्थितीने सुरू होतील. मात्र संरक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण ही मंत्रालये, भारतीय अन्न महामंडळासारख्या सरकारी संस्था व सर्व केंद्रीय निमलष्करी दले पूर्ण क्षमतेने काम सुरू करतील.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्... 

Coronavirus  : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे' 

२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू

CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'

 

Web Title: Coronavirus Central and state government offices will start from Monday SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.