Coronavirus: कोरोनाच्या नवीन B.7 व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर; विमानतळावर रँडम टेस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 01:28 PM2022-12-25T13:28:00+5:302022-12-25T13:30:43+5:30

COVID-19 India: परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Coronavirus: Central government on alert due to new B.7 variant of Corona; Random testing at the airport | Coronavirus: कोरोनाच्या नवीन B.7 व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर; विमानतळावर रँडम टेस्टिंग

Coronavirus: कोरोनाच्या नवीन B.7 व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार अलर्टवर; विमानतळावर रँडम टेस्टिंग

googlenewsNext

Coronavirus in India: तिकडे चीनमध्ये कोरोना विषाणूने पुन्हा थैमान घातले आहे. कोरोनाच्या नवीन BF.7 व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्य सरकार अलर्टवर आली आहेत. यातच दिल्लीतील आयजीआय एअरपोर्टवर(IGI Airport) विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम टेस्टिंग केली जात आहे. विमानतळावर दररोज येणाऱ्या 25 हजार प्रवाशांपैकी दोन टक्के लोकांची चाचणी केली जात आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जेनस्ट्रिंग्स डायग्नोस्टिक सेंटरच्या संस्थापक डॉ. गौरी अग्रवाल यांनी सांगितले की, दिल्ली विमानतळावर येणाऱ्या 25,000 प्रवाशांपैकी 500 प्रवाशांची रँडम टेस्टिंग केली जात आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी 24 डिसेंबरला सांगितले होते की, दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर चीन, हॉगकॉग, जापान आणि साउथ कोरियासह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम टेस्टिंग केली जाईल. चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही पाऊले उचलली आहेत.
 

Web Title: Coronavirus: Central government on alert due to new B.7 variant of Corona; Random testing at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.