Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:54 PM2021-06-02T23:54:09+5:302021-06-02T23:56:56+5:30

Coronavirus Pandemic India : दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

Coronavirus Central government responsible for coronavirus deaths aimim Asaduddin Owaisi | Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

Next
ठळक मुद्देदुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेचा मोठा फटका सर्वांना बसला. दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या मृत्यूंना केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला. 

"मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. कोरोनाच्या विरोधात रोडमॅप तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ८ एप्रिल रोजी त्यांनी आपण कोरोनाविरोधात लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. "क्रिकेटच्या मैदानावर पंतप्रधानांनी आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्या देशांना देण्यासाठी आपण लसींची व्यवस्था केली. परंतु वेळे असतानाही आपण सतर्क झालो नाही आणि लसींची निर्यात सुरू ठेवली. ऑक्सिजनसाठीही पंतप्रधान आणि त्यांचं सरकारच जबाबदार आहे," असं ते म्हणाले. 

ऑक्सिजनची जबाबदारी पंतप्रधानांवर

"ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. ना लसीची ऑर्डर दिली, ना आगाऊ रक्कम दिली. तुम्ही आगाऊ रक्कम मार्च महिन्यापासून दिली. एक प्रकारे तुम्हीच दुसऱ्या लाटेला दावत दिली. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ ३.२ कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि १६ कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?" असा सवाल करत ओवेसी यांनी सरकावर निशाणा साधला.

लसीबाबत सरकार खोटं बोलतंय

"लसीबाबत सरकार खोटे दावे करत आहे. आजही लसींच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं काय तयारी केली. फायझरनं डिसेंबर २०२० मध्ये मंजुरी मागितली होती. परंतु सरकारनं ती आता दिली. २०० कोटी डोसचं आश्वासन खोटं आगे. इथे मृतांचा खच भरला आहे. दुसऱ्या लाटेत ४ ते ५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. कोरोनावर कोणता विजय मिळवला आहे तो एकदा सांगावा," असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

लॉकडाऊनचा कोरोनाला रोखण्याशी संबंध नाही

"लॉकडाऊनचा कोरोना विषाणूला रोखण्याशी संबंध नाही. लॉकडाऊनमध्ये आयसीयू बेड्स मिळतील का, ब्लॅक फंगसचं औषध मिळेल का? प्रत्येक गरीबाच्या खात्यात १० हजार रूपये टाका आणि नंतर लॉकडाऊन लावा. मी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर जात आहे. लोकांना लसीकरणाचं आवाहन करत आहे. कोविन अॅपची गरज काय? देशात फक्त २५ टक्के लोकांकडे इटरनेटची सुविधा आहे. बाकी लोकं हे अॅप कसं वापरतील. थेट जाऊन लसीकरण करून घेण्याची परवानगी का दिली जात नाही," असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मी मुस्लिम नागरिकांनाही जाऊन लस घेण्याचं आव्हान करतोय. त्यांनी जरूर लसीकरण करून घ्यावंस इस्लाममध्ये जीव वाचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांसह मी सर्वच देशवासीयांना लस घेण्याचं आवाहन करतो," असं ओवेसी म्हणाले.

Web Title: Coronavirus Central government responsible for coronavirus deaths aimim Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.